शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस

By admin | Updated: May 7, 2014 21:22 IST

दक्षिण कोकणासह ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, रोहा, कर्जत परिसरात आज सायंकाळी वादळी वार्‍यावर जोरदार पाऊस झाला

रेल्वे, रस्ते वाहतुक विस्कळीत पुणे : दक्षिण कोकणासह ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, रोहा, कर्जत परिसरात आज सायंकाळी वादळी वार्‍यावर जोरदार पाऊस झाला असून येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़ अचानक आलेल्या या पावसाने मुंबई, पुणे महामार्गावरील रस्ते वाहतुक अनेक ठिकाणी ठप्प झाली होती़ तर खंडाळा घाटात रेल्वमार्गावर झाड पडल्याने पुण्याकडे येणार्‍या सिंहगड, प्रगती एक्सप्रेस, चिन्नई एक्सप्रेससह अनेक गाड्या वाटेत खोळंबून राहिल्या आहेत़ पुण्याहून मुंबईला जाणार्‍या डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस वाटेत थांबून ठेवण्यात आल्या होत्या़ कोकणातील सिंधदुर्ग, सावंतवाडी, राजापूर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, रोहा, ठाणे तसेच मुंबईच्या उपनगरात आज सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली़ तसेच कर्जत, लोणावळा, खंडाळा, तळेगाव परिसरात आज सायंकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ अनेक ठिकाणी मार्गावर झाडे कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता़ कर्जत ते खंडाळा या घाट मार्गात रेल्वेमार्गावर आज दुपारी पावणेचारच्या सुमारास एक झाड उन्मळून पडले़ त्यामुळे मुंबई -पुणे रेल्वे वाहतुक ठप्प झाली़ मुंबईहून पुण्याकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस नेरळ येथे थांबवून ठेवण्यात आली़ त्याच्या पाठोपाठ येणारी, चिन्नई एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, डेक्कन क्वीनही वाटेत थांबविण्यात आल्या होत्या़ पुण्याहून जाणारी डेक्कन एक्सप्रेस लोणावळा येथे थांबविण्यात आली होती़ लोणावळ्याहून स्वतंत्र गाडी पाठवून रेल्वेमार्गावर पडलेले हे झाड बाजूला केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर वाहतुक पुन्हा सुरु झाली़ त्यामुळे सिंहगड एक्सप्रेसला पुण्यात पोहचण्यास सुमारे २ तास उशीर झाला़ पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात मराठवाड्यात काही ठिकाणी आणि कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे ७, महाबळेश्वर ७, सोलापूर ०़१, भिरा ८, रत्नागिरी ८, उस्मानाबाद २ मिमी पावसाची नोंद झाली होती़ पुढील ४८ तासात दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुणे व परिसरात सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे़ केरळ व परिसरात कमी दाबाचा प˜ा निर्माण झाल्याने तामिळनाडूत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून दक्षिण कर्नाटक, केरळ तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नाग्रालंड, मणीपूर येथे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे़