शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

पावसाची रात्री पुन्हा हजेरी

By admin | Updated: September 20, 2016 02:32 IST

गुरुवारपासून रविवारपर्यंत कोसळणाऱ्या पावसाने अखेर सोमवारी उघडीप घेतल्याने मुंबईकरांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला.

मुंबई : गुरुवारपासून रविवारपर्यंत कोसळणाऱ्या पावसाने अखेर सोमवारी उघडीप घेतल्याने मुंबईकरांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला. चार दिवस सलग कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांचे अक्षरश: हाल झाले होते. सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी किंचितसा बरसलेला पाऊस वगळता उर्वरित काळ कडक ऊन पडल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. दरम्यान, सकाळ, दुपार आणि सायंकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पुन्हा जोर पकडल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली.मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत शहरात २८.२४ मिलीमीटर, पूर्व उपनगरात २०.३७ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात १९.५१ मिलीमीटर पाऊस पडला. सोमवारी सकाळी पडलेल्या ऊन्हानंतर दुपारी काही काळ शहरात ढगांनी गर्दी केली होती. मात्र किंचित बरसलेल्या सरींनी पुन्हा उघडीप घेतली. पुन्हा ४ वाजेपर्यंत पडलेल्या उन्हानंतर तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना सुरूच असून, शहरात १, पूर्व उपनगरात ६ अशा एकूण ७ ठिकाणी घरांच्या भिंतीचा भाग पडला. शहरात ५, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण १२ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ८, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ११ अशा २२ ठिकाणी झाडे पडली. यात मनुष्यहानी झाली नाही. (प्रतिनिधी)