शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस गायब; मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 04:27 IST

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांतून पाऊस गायब झाला असून खरीप पिके धोक्यात आली आहेत. औरंगाबाद, लातूर विभागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दोन-चार दिवस पाऊस न आल्यास पिके धोक्यात येऊ शकतात, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पुणे : मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांतून पाऊस गायब झाला असून खरीप पिके धोक्यात आली आहेत. औरंगाबाद, लातूर विभागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दोन-चार दिवस पाऊस न आल्यास पिके धोक्यात येऊ शकतात, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्यात ८ आॅगस्टअखेर ७०४ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत आतापर्यंत ५२७ मिलिमीटर पाऊस झाला. औरंगाबाद आणि लातूर विभागातील बहुतांश भागात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, खुलताबाद, सोयगाव तालुक्यात, तर बीड जिल्ह्यातील आष्टी, माजलगाव, अंबेजोगाईमधील पिकांची वाढ खुंटली आहे. हीच स्थिती जालनातही आहे.दुष्काळ जाहीर करामराठवाड्यात गेल्या दीड महिन्यात पावसाचा थेंब पडलेला नाही. खरीप पिके संकटात आहेत. दररोज दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुण मुले आणि मुलींमध्येही आत्महत्येचे लोण पसरले असतानाही राज्यकर्ते हातावर हात ठेवून बसले आहेत, याकडे लक्ष वेधत मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी विरोधकांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.लातूर विभागातील ४८ तालुक्यांपैकी १५ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, तर २२ तालुक्यांत ५० ते ७५ टक्केच पाऊस झाला आहे. येथील २७.१५ लाख हेक्टरवर (१०० टक्के) पेरणीची कामे उरकली आहेत. लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब, नांदेड जिल्ह्यासह देगलूर व हिमायतनगर, परभणीतील गंगाखेड, पाथरी, पालम, जिंतूर व पूर्णा आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनूरी तालुक्यातील पिके सुकू लागली आहेत.