शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात धरणक्षेत्रात पाऊस

By admin | Updated: July 17, 2017 02:05 IST

पश्चिम वऱ्हाडात अकोला जिल्हा वगळता रविवारी वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. कोल्हापूर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम वऱ्हाडात अकोला जिल्हा वगळता रविवारी वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. कोल्हापूर व नाशिकमध्येही धरणक्षेत्रात पाऊस झाला. नाशिकला गंगापूर धरणातून दोन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मराठवाड्यात मात्र लातूर वगळता इतर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरीसह सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी २३ फुटांपर्यंत पोहोचली असून, अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी, कासारी धरणक्षेत्रात सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी सुरू आहे. राधानगरी धरण ६४ टक्के भरले आहे. सांगली जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. धरणातील पाणीसाठा १८.४८ टीएमसी झाला आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे रविवारी पावसाची संततधार सुरू होती. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात सध्या ४५.४४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.विदर्भात रविवारी सकाळपासून वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरु झाला तर बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुका वगळता समाधानकारक पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा आहे. तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात रविवारी सर्वदूर पाऊस झाला.