शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत पुन्हा ‘रेन ब्लॉक’

By admin | Updated: June 28, 2016 04:35 IST

शहरात मुसळधार पावसाचा मारा सोमवारीही सुरूच राहिला.

मुंबई : शहरात मुसळधार पावसाचा मारा सोमवारीही सुरूच राहिला. परिणामी, मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ‘रेन ब्लॉक’ झाला. पाणी साचून ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. उपनगरात दिवसभर पावसाची संततधार होती. त्यामुळे पूर्व उपनगरांत लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी जोड रस्ता आणि पश्चिम उपनगरात एस. व्ही. रोडवर वाहतुकीचा खोळंबा झाला आणि मुंबईकरांची दैना उडाली. रेल्वेने मात्र वेळापत्रक पाळल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.सोमवारी सकाळी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत दाखल झालेला पाऊस सायंकाळीही कायम होता. मुंबई शहरात मरिन ड्राइव्ह, कुलाबा, भायखळा, महालक्ष्मी, वरळी, दादर आणि प्रभादेवी येथे विश्रांती घेत बरसणाऱ्या पावसामुळे वाहतूककोंडी झाली होती. विशेषत: दक्षिण मुंबईत मोहम्मद अली रोडवर पावसामुळे झालेल्या कोंडीने येथील वाहतूक विस्कळीत झाली. करीरोड आणि चिंचपोकळी या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या ना.म. जोशी मार्गावरही वाहतूककोंडी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सायन रुग्णालय येथे पाणी साचल्याने माटुंगा आणि शीव येथे कोंडी झाली.पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. कुर्ला डेपो, कल्पना सिनेमा, शीतल सिग्नल, कमानी नाका, घाटकोपरमधील श्रेयस सिनेमा आणि भांडुप स्टेशन रोडवर कोंडी झाली. दुपारी पूर्व उपनगरात सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसह कुर्ला स्टेशनकडे जाणारा रस्ता आणि वांद्रे, कलिनाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर झालेली वाहतूककोंडी सुटण्यास पाऊण तासाहून अधिक काळ लागला. बैलबाजार, साकीनाका, मरोळ आणि घाटकोपर येथील असल्फा या ठिकाणी दुपारी वाहतूककोंडी झाली. पश्चिम उपनगरात एस. व्ही. रोडसह पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे आणि अंधेरी येथे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. (प्रतिनिधी)> २७ ठिकाणी पाणी तुंबले : शहरात १०, पूर्व उपनगरांत ७ आणि पश्चिम उपनगरांत १० अशा एकूण २७ ठिकाणी पाणी तुंबले. येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका मुख्यालयातून संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.११ ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या : शहरात ४, पश्चिम उपनगरात ४ आणि पूर्व उपनगरात ३ अशा एकूण ११ ठिकाणी घरांच्या भिंतीचा भाग पडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याबाबत महापालिकेकडून संबंधित विभागांना सूचना देत मदतही पुरवण्यात आली.१७ ठिकाणी शॉर्टसर्किट : शहरात १०, पूर्व उपनगरांत २ आणि पश्चिम उपनगरांत ५ अशा एकूण १७ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. कोणीही जखमी झाले नाही.२२ ठिकाणी झाडे पडली : शहरात ९, पूर्व उपनगरांत ६ आणि पश्चिम उपनगरांत ७ अशा एकूण २२ ठिकाणी झाडे पडली. पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलण्याचे काम महापालिकेकडून करण्यात आले.