शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय

By admin | Updated: August 12, 2015 02:35 IST

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. सोमवारी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. विदर्भात पावसाला

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. सोमवारी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. विदर्भात पावसाला अधिक जोर राहिला. पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली होती. मंगळवारी कोकणासह संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पुनरागमन केल्याने काहीसा दिलासा मिळालेला आहे. उत्तर आंध्रप्रदेश - दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या पश्चिम-मध्य व वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिमाणी राज्यात पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात चंद्रपूर व वर्धा येथे प्रत्येकी २१ मिमी पाऊस पडला. तर यवतमाळ येथेही १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागपूर, अमरावतीतही पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाचा जोर कमी होता. मध्य महाराष्ट्रात पुण्यासह कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सांगली या भागात पावसाने हजेरी लावली. येत्या गुरुवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भासह मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवानानशास्त्र विभागाने व्यक्त केली.मंगळवारी काही शहरांत पडलेला पाऊस (मिमीमध्ये)कोल्हापुर ०.२, महाबळेश्वर ५, नाशिक २, सांगली १, मुंबई ३, अलीबाग ७, रत्नागिरी २, औरंगाबाद २, परभणी ०.२, बीड १, अमरावती ६, चंद्रपुर २१, नागपूर ८, वर्धा २१, यवतमाळ १४.