शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मार्गाचे काम एप्रिलपासून

By admin | Updated: January 21, 2016 03:57 IST

जयगड बंदर कोकण रेल्वे मार्गाशी जोडण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या जयगड ते डिंगणी मार्गासाठी जमीन भूसंपादनाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार

मुंबई : जयगड बंदर कोकण रेल्वे मार्गाशी जोडण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या जयगड ते डिंगणी मार्गासाठी जमीन भूसंपादनाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार असून एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची ७० वी बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील बंदरांचा विकासासाठी शासन आग्रही आहे. कोकण रेल्वे कार्पोरेशन, जयगड बंदर आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत जयगड ते डिंगणी हा ३५ कि.मी.चा नवीन रेल्वेमार्ग निर्माण करण्यात येत आहे. ७७५ कोटींच्या या प्रकल्पाच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण कोकण रेल्वे कार्पोरेशनने पूर्ण केले आहे.या बैठकीत व्यापक ‘बंदर विकास धोरण-२०१५’ च्या सद्य:स्थितीवर त्याचबरोबर रेवस-आवरे, विजयदुर्ग व रेडी या बंदर विकास प्रकल्पांना मुदतवाढ देण्याबाबत चर्चा झाली. तसेच ‘महाराष्ट्र जलक्रीडा प्रकल्प धोरण-२०१५’ तयार करण्यात आले असून त्यास बोर्डाची मान्यता देण्यात आली. तर डहाणू तालुक्यातील वाढवण येथे सॅटेलाईट पोर्टच्या निर्मितीकरिता जेएनपीटी व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील सामंजस्य करारास मंजुरी देणे, दिघी-रोहा रेल्वे जोडणी प्रकल्पात बोर्डाने घ्यावयाचे समभाग, पनवेल खाडीमध्ये मौजे उलवा येथे शिपयार्ड प्रकल्प निर्माण करणे, वांद्रे-वरळी सागरी सेतुनजीक माहीम खाडीमधील बोर्डाच्या मालकीच्या जेट्टीवरुन तरंगते हॉटेल प्रकल्प चालविणे, ठाणे खाडी किनारी वाशी पुलाजवळ मौजे तुर्भे येथे बहुउद्देशीय जेट्टी निर्माण करणे, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे बोर्डाच्या स्वमालकीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे, रेवस येथे अंतर्गत जल वाहतूक प्रकल्पांतर्गत रो-रो जेट्टी तसेच सुविधा विकसित करणे आदी विषयांचे सादरीकरण करण्यात आले.