शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत उभारणार रेल्वे टर्मिनस

By admin | Updated: May 31, 2016 06:16 IST

मुंबईतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेन (मेल-एक्स्प्रेस) नवी मुंबईकरांना पनवेलमधून पकडाव्या लागत असतानाच सुरुवातीपासून ट्रेन पकडण्यासाठी एलटीटी किंवा सीएसटीपर्यंत पायपीट करावी लागत होती

मुंबई : मुंबईतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेन (मेल-एक्स्प्रेस) नवी मुंबईकरांना पनवेलमधून पकडाव्या लागत असतानाच सुरुवातीपासून ट्रेन पकडण्यासाठी एलटीटी किंवा सीएसटीपर्यंत पायपीट करावी लागत होती. मात्र आता ही पायपीट थांबणार असून, पनवेलमधूनही मेल-एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी पनवेलमध्ये नवीन रेल्वे टर्मिनस येत्या तीन वर्षांत उभारण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. सोमवारी परेल टर्मिनस आणि पनवेल टर्मिनसचा कोनशिला समारंभ सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद, एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी या वेळी उपस्थित होते. पनवेलमध्ये मेल-एक्स्प्रेससाठी टर्मिनस उभारतानाच कोचिंग टर्मिनस बांधले जाईल. पनवेल टर्मिनससाठी १५४ कोटींचा खर्च असून, येत्या तीन वर्षांत ते बांधले जाईल. यात तीन प्लॅटफॉर्म असतील आणि येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येतील, असे ते म्हणाले. कोचिंग टर्मिनसमध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि त्याच्या विकासाकडे केंद्राकडून विशेष लक्ष दिले जात असून, रेल्वेसाठी केंद्राकडून तसेच राज्याकडून मोठ्या प्रमाणात खर्चही केला जात असल्याचे सांगितले. मुंबई रेल्वेचा विकास मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हा विकास करताना आणखी काही प्रकल्प येत्या काळात सुरू केले जाणार असल्याची माहितीही प्रभू यांनी दिली. दादर स्थानकावर पडणारा ताण पाहता लोकलसाठी परेल टर्मिनस उभारण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. परेल हे एकेकाळी शेवटचे ठिकाण मानले जात होते. मात्र आता यावरही भार वाढत असून, त्यासाठी टर्मिनसची गरज भासत असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. हे पाहता परेल टर्मिनस उभारण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ५१ कोटी रुपये खर्च असून, तीन वर्षांत ते बांधले जाईल. तीन प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, सब-वे बांधतानाच प्लॅटफॉर्मला रस्त्यांची थेट जोड दिली जाईल. पनवेल ते कळंबोली अशी डेडिकेटेड लाइन बांधली जाईल. जेणेकरून यावरून देखभाल-दुरुस्ती व सफाईसाठी डबे आगारात पाठविण्यास मदत होईल. कळंबोलीमध्ये चार वॉशिंग लाइन, दोन स्टॅबलिंग लाइन आणि डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुविधा उभारण्यात येतील. हे टर्मिनस ३१ मार्च २0१९पर्यंत उभारले जाईल. च्एमयूटीपी-२मधील सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्गातील परेल टर्मिनस हा एक भाग आहे. च्८९१ कोटी रुपये या मार्गासाठी खर्च येणार असून, परेल टर्मिनससाठी ५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. च्परेल टर्मिनसमध्ये एक टर्मिनल लाइन बांधतानाच दोन्ही बाजूंना प्लॅटफॉर्म असेल.च्सध्याच्या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवितानाच पादचारी पुलाची रुंदीही वाढविली जाईल. च्कॅरोल पुलावर असणाऱ्या पादचारी पुलाला दक्षिण दिशेला स्कायवॉक जोडला जाईल. च्एलिव्हेटेड तिकीट बुकिंग कार्यालय असेल.