शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खोपोली मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प

By admin | Updated: January 30, 2016 02:01 IST

खोपोली-कर्जत रेल्वेमार्गावर पळसदरी ते केळवली स्थानकाच्या दरम्यान शुक्रवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने खोपोली, कर्जत, मुंबई मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.

खालापूर : खोपोली-कर्जत रेल्वेमार्गावर पळसदरी ते केळवली स्थानकाच्या दरम्यान शुक्रवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने खोपोली, कर्जत, मुंबई मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. ओव्हरहेड वायर तुटल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत एकही ट्रेन खोपोलीत आली नव्हती. तब्बल आठ तासांहून अधिक वेळ दुरुस्तीचे काम सुरू होते. कर्जतवरून पहिली ट्रेन दुपारी ३ वाजता खोपोलीत आली. ट्रेन बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कर्जत येथून खोपोलीकडे येणारी ट्रेन पळसदरी व केळवली स्थानकांच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने थांबली. ट्रेनचा वेग अधिक असल्याने काही खांबही ओव्हरहेड वायरसोबत पडले होते. बंद पडलेल्या ट्रेनला डिझेल इंजिन लावून पळसदरी स्थानकात हलविण्यात आले. ओव्हरहेड वायर व खांब तुटल्याने खोपोली-कर्जत मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली होती. पडलेले खांब उभे करून ओव्हरहेड वायर जोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाला ८ तासांहून अधिक वेळ लागल्याने या मार्गावरील रेल्वेसेवा बंद होती. दुपारी दोन वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्जतवरून खोपोलीकडे पहिली ट्रेन सोडण्यात आली. खोपोलीकडे येणारी ट्रेन पळसदरी स्थानकात दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे खोपोलीचे स्टेशन प्रबंधक आर. सी. मीना यांनी सांगितले. (प्रतिनिधी)