शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे सुरक्षा बलाकडे नाहीत अग्निशमनचे नंबर

By admin | Updated: August 27, 2016 03:22 IST

विरारच्या रेल्वे सुरक्षा बलाकडे वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे क्रमांक नसल्याची माहिती समोर आली आहे.

विरार : विरारच्या रेल्वे सुरक्षा बलाकडे वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे क्रमांक नसल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात विरार रेल्वे स्थानकातील फलाटावर लागलेल्या आगीनंतर मदतीसाठी रेल्वे सुरक्षा बलाने अग्निशमन दलाऐवजी रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला पाचारण केले होते.मागील सोमवारी विरारच्या फलाट क्रमांक १ वर शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी आग लागली होती. गर्दीची वेळ असल्याने एकच हलकल्लोळ उडाला होता. आग लागताच स्थानिक अग्निशमन दलाला पाचारण करणे आवश्यक असते. परंतु रेल्वे सुरक्षा बलाकडे स्थानिक अग्निशमन दलाचे नंबर नसल्याने त्याने आग लागल्यावर रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला या आगीबाबत कळवले. नियंत्रणकक्षाने पुढील हालचाली केल्या. सव्वा सात वाजता महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथक पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आम्ही आपतकालीन परिस्थितीत स्थानिक यंत्रणांना संपर्क करत बसलो तर वेळ जातो. त्यामुळे आमच्या नियंत्रण कक्षाला कळवत असतो असे रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरिक्षक यशवंत प्रजापती यांनी सांगितले. नियंत्रण कक्षाला कळवल्यास तत्पर कारवाई होते असाही त्यांनी दावा केला.यामुळे रेल्वे सुरक्षा बलाचाच हलगर्जीपणा आणि गलथान कारभार समोर आला आहे. जर रेल्वे सुरक्षा बलाने तात्काळ स्थानिक अग्निशमन दलाला पाचारण केले असते तर आणखी लवकर मदत मिळून आग लवकरच आटोक्यात आणता आली असती असे रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)