शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

राज्याच्या मागास भागात धावणार रेल्वे

By admin | Updated: April 19, 2015 00:41 IST

महाराष्ट्राच्या गडचिरोलीसह अन्य अविकसित भागात रेल्वेच्या जाळ्याचा विकास आणि प्रसार करण्यासाठी भारतीय रेल्वे लवकरच महाराष्ट्र शासनासोबत करार करणार आहे.

नागपूर : महाराष्ट्राच्या गडचिरोलीसह अन्य अविकसित भागात रेल्वेच्या जाळ्याचा विकास आणि प्रसार करण्यासाठी भारतीय रेल्वे लवकरच महाराष्ट्र शासनासोबत करार करणार आहे.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले की, आगामी काही दिवसांत महाराष्ट्र शासनाच्या मदतीने कंपनी स्थापन केली जाईल़ ही कंपनी राज्यातील विविध भागातील रेल्वे लाईनचा विकास करेल. हा करार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार आहे. हा करार १० दिवसांच्या आत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रभू म्हणाले, रेल्वेजवळ आर्थिक तरतुदीचा तुटवडा नाही. मंत्रालयाच्या निधी गोळा करण्याच्या नव्या पद्धतीनुसार रेल्वेत ८.५० ट्रिलियन रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात येईल. (प्रतिनिधी)नागपूर- वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे खासदार विजय दर्डा यांनी स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला. या निर्णयामुळे विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्णाच्या विकासाची दालने उघडतील, असे खासदार विजय दर्डा यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, खासदार दर्डा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते २००९ साली यवतमाळात या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. हा प्रकल्प जलद गतीने मार्गी लागावा, यासाठी खासदार विजय दर्डा यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री रामविलास पासवान, मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी पत्रव्यवहार केला. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतरही त्यांनी आपला पाठपुरावा कायम ठेवला. फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत तर १६ मार्च रोजी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वेमार्गाचा प्रश्न लावून धरला होता. दरम्यान, रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकल्पाला गती देण्याचे ठोस आश्वासन दिले होते, हे विशेष.पंतप्रधान मोदींनीही दिले होते आश्वासनखासदार विजय दर्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही या प्रकल्पाकडे लक्ष वेधले होते. भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाकडे स्वत: लक्ष घालून हा प्रकल्प फास्ट ट्रॅकवर ठेवण्याचे आश्वासन खासदार दर्डा यांना दिले होते.नागपुरात मल्टी मॉडेल हब : लॉजिस्टीक कार्पोरेशन आॅफ इंडियाचे गठन करण्याची घोषणा सुरेश प्रभू यांनी सांगितले. केंद्रस्थानी असल्यामुळे सरकार नागपूरमध्ये मल्टी मॉडेल हब स्थापन करण्याचा विचार करीत असल्याचेही प्रभू म्हणाले.