शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने पाणी नेण्याचा प्रस्ताव गुंडाळला !

By admin | Updated: September 9, 2015 00:20 IST

लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचा प्रस्ताव जवळपास गुंडाळल्यात जमा असून, इतर चार पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव

औरंगाबाद : लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचा प्रस्ताव जवळपास गुंडाळल्यात जमा असून, इतर चार पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी लातुरात रेल्वे स्थानक आणि विहिरींची पाहणी केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. लातूरला वेळेत पाणीपुरवठा होईल व तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा असेल, अशा पर्यायांचा विचार सुरू आहे. रेल्वेने पाणी देण्याचा शेवटचा पर्याय असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी स्पष्ट केले. प्रधान सचिवांनी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी पाहणी केली असली तरी त्यांच्याशी सुद्धा सर्व पर्यायांवर चर्चा करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव खर्चिक असल्याने इतर पर्याय निवडण्याच्या सूचना प्रशासनाला वरिष्ठांकडून मिळाल्या आहेत. दांगट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी लातूर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग अभियंत्यांची बैठक झाली. त्यात भंडारवाडी प्रकल्पाच्या योजनेसाठी ३० कोटींचा निधी देण्याचे ठरले. तेथून २ एमएलडी पाणीपुरवठा होणे शक्य आहे. मनपाने या योजनेसाठी निविदा काढल्या होत्या; परंतु ठेकेदार पुढे न आल्यामुळे जीवन प्राधिकरणाकडे योजनेचे काम देण्याचे ठरले.एकीकडे दांगट यांनी रेल्वेचा पर्याय गुंडाळल्याचे संकेत दिले असतानाच पाणीपुरवठा विभागाचे राज्याचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी मंगळवारी रेल्वे स्थानक व रेल्वेने आणलेले पाणी ज्या विहिरीत टाकले जाणार आहे, त्या एस़आऱदेशमुख यांच्या शेतातील विहिरीची पाहणी केली. जलशुध्दीकरण केंद्र, बॅरेजस, भंडारवाडी मध्यम प्रकल्पाची पाहणी करण्यापूर्वी राजेशकुमार यांच्यासह शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली़ त्यातही रेल्वेच्या पाण्याबाबत चर्चा झाली. (प्रतिनिधी)चार पर्याय -नागझरी प्रकल्पात विहीर घेणे-मांजरा धरणपात्रात विहिरी घेणे-भंडारवाडीची रखडलेली योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करणे-उस्मानाबाद येथून जलवाहिनीने पाणी आणणेलातूरकरांना दररोज ५० एमलएलडी पाणी लागते. मात्र महिन्यातून दोन वेळा म्हणजे १०० एमएलडी पाणी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.