शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्प कंपनी कागदावरच

By admin | Updated: August 28, 2015 02:09 IST

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलद्वारे मार्गी लावण्याकरिता महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीची स्थापना करण्याबाबत दोन महिन्यांपूर्वी सहमती

- संदीप प्रधान,  मुंबईमहाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलद्वारे मार्गी लावण्याकरिता महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीची स्थापना करण्याबाबत दोन महिन्यांपूर्वी सहमती करार करण्यात आला. मात्र या कंपनीचे अध्यक्ष असलेल्या मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी प्रत्यक्ष कंपनी स्थापन करण्याकरिता गेल्या दोन महिन्यांत कुठलीही हालचाल केलेली नाही.रेल्वेमंत्री झाल्यावर सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्रातील रखडलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याकरिता कंपनी स्थापन करण्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली. त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. २८ जून २०१५ रोजी रेल्वेमंत्री प्रभू व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत या कंपनीच्या स्थापनेबाबतचा सहमती करार केला गेला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सूद हे कंपनीचे अध्यक्ष असल्याने कंपनी स्थापनेकरिता करायचे शेअर होल्डर अ‍ॅग्रिमेंट, आर्टिकल आॅफ असोसिएशन वगैरे प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता अध्यक्ष या नात्याने महाव्यवस्थापकांनीच पुढाकार घेणे अपेक्षित होते. ही प्रक्रिया करणारी रेल इंडिया टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड इकॉनॉमिक सर्व्हिसेस (राईटस) ही कंपनी त्याकरिता साहाय्य करण्यास उत्सुक असतानाही महाव्यवस्थापकांकडून कुठलीही हालचाल केली गेली नाही. मुख्यमंत्री कार्यालयाकडून कंपनी स्थापनेच्या प्रगतीबाबत सातत्याने विचारणा सुरू झाल्यावर आता राज्य सरकारने महाव्यवस्थापक कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र रेल्वेमंत्र्यांच्या पुढाकाराने ज्या कंपनीच्या सहमतीचा करार झाला त्याबाबत रेल्वे प्रशासन अनिच्छा दाखवते यावरून मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबद्दल रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसे सोयरसुतक नाही त्याचे हे ताजे उदाहरण आहे.