शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘बालक-पालक’भेटीत रेल्वे पोलिसांचे योगदान

By admin | Updated: January 26, 2016 03:05 IST

मुंबईचे आकर्षण, अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचा ओरडा यासह अनेक कारणांमुळे घरातून पळून आलेल्या किंवा पालकांसह रेल्वे स्थानकात येताच हरविलेल्या बालकांना

मुंबई : मुंबईचे आकर्षण, अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचा ओरडा यासह अनेक कारणांमुळे घरातून पळून आलेल्या किंवा पालकांसह रेल्वे स्थानकात येताच हरविलेल्या बालकांना (१८ वर्षांखालील) यशस्वीरीत्या त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याची कामगिरी जानेवारी महिन्यातील अवघ्या २४ दिवसांतच रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) पार पाडली आहे. यात १ हजार १0२ बालकांपैकी १ हजार १३ बालके स्वगृही परतल्याची माहिती देण्यात आली. यासाठी आॅपरेशन स्माइल नावाने ही कामगिरी पार पाडण्यात आली. मुंबई उपनगरीय रेल्वेचा पसारा हा चर्चगेट ते डहाणू, सीएसटी ते कर्जत, आणि हार्बरपर्यंत आहे. या तीनही मार्गांवरून दररोज ७५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास करताना अनेक रेल्वे स्थानकांवर विविध कारणांमुळे कोणी घरातून पळून आल्याने तर गर्दीमुळे पालकांचा हात सुटल्याने बालके हरविल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) होते. २0१६मधील १ ते २४ जानेवारीपर्यंत तब्बल १ हजार १0२ मुले-मुली हरविल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे झाली. मात्र याच २४ दिवसांत त्यांच्या पालकांशी संपर्क साधून १ हजार १३ मुला-मुलींना ताब्यात देण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे हरविलेल्यांमध्ये ७५३ मुलांचा तर ३४९ मुलींचा समावेश होता. मुंबई सेंट्रल आणि सीएसटी स्थानकात हरविलेल्या बालकांची सर्वाधिक नोंद झाली आहे. मुंबई सेंट्रलमध्ये २६६ तर सीएसटी २३६ बालके हरविल्याची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. दादरमध्ये १५६ बालके हरविली होती. बाल कल्याण समितीसमोर ८९ बालकांची हजेरी१ हजार १0२ बालकांपैकी १ हजार १३ बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तर ८९ बालकांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)