शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

रेल्वेच्या धरणाचे पाणी ठाण्यालाही

By admin | Updated: April 24, 2016 04:40 IST

नवी मुंबईच्या हद्दीत असलेल्या रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता नवी मुंबईबरोबरच ठाण्यालाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भात टिष्ट्वट केल्यानंतर

ठाणे : नवी मुंबईच्या हद्दीत असलेल्या रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता नवी मुंबईबरोबरच ठाण्यालाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भात टिष्ट्वट केल्यानंतर या धरणाची पाहणी रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि ठाणे महापालिका आयुक्त सोमवारी करणार आहेत. कळवा-मुंब्य्रातील नागरिकांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीची पाणीकपात ६० तासांची झाल्याने सलग तीन दिवस येथील रहिवाशांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून कळवा आणि रबाळेच्या दरम्यान पारसिक पुलाच्या मागे बंद असलेले रेल्वेचे डी धरण उपयोगात आणण्याबाबत ठाणे महापालिका आणि रेल्वे विभागाकडे मागणी करण्यात येत होती. यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेकडे पत्रव्यवहारदेखील केला होता. तसेच ठाणे शहर मनसेचे प्रदीप सावर्डेकर यांनीदेखील पालिका आणि रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, काही दिवसांपूर्वी या धरणाचे पाणी नवी मुंबईला वळवण्यात मोलाचा वाटा उचलणारे खासदार राजन विचारे यांचा राष्ट्रवादी आणि मनसेने निषेध केला. त्यामुळे त्याच्या पाण्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले होते. इंग्रजांच्या काळात जेव्हा रेल्वे ट्रॅक हा ठाण्याच्या पुढे न्यायचा होता, त्या वेळी येथे डोंगर पोखरून दोन मोठे बोगदे तयार करण्याचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून मजूर आणले गेले होते. या मजुरांच्या निवाऱ्याची व्यवस्था या डोंगरावर केली होती. परंतु, त्यांच्या पाण्याचा प्रश्न कायम होता, तेव्हा त्यांच्याकरिता रेल्वेने हे डी धरण बांधले. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेल्या सूचनेनंतर आता सोमवारी या धरणाची संयुक्त पाहणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सूद आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल करणार आहेत. यास आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंबरनाथ येथेही रेल्वेच्या मालकीचे आणखी एक धरण आहे. ते जीआयपी टँक (गे्रट इंडियन पेनिनसुला) या तत्कालीन रेल्वे कंपनीच्या नावाने ओळखले जाते. त्याची क्षमता ६ एमएलडी इतकी आहे. सध्या त्याच्या पाण्यावर ‘रेल नीर’ हा रेल्वेचा मिनरल वॉटरचा प्रकल्प सुरू आहे.04 दशलक्षलीटर एवढी या धरणाची क्षमता असून, त्याची दुरुस्ती केल्यास ते सुमारे १२ ते १५ दशलक्षलीटर क्षमतेचे होऊ शकणार आहे. त्याच्या जमिनीचा मालकी हक्क रेल्वेकडे असून, ते मुंब्य्राच्या डोंगराच्या मागे रबाळे व पारसिकच्या मध्ये आहे. त्याला ‘डी धरण’ म्हणून संबोधले जाते.