शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

स्वतंत्र विदर्भासाठी रेल रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 16:32 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती व शेतकरी कर्जमुक्तीसाठी गुरुवारी वर्ध्यातील सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. 6 - वर्धा - स्वतंत्र विदर्भ राज्य आमच्या हक्काचा...ह्ण अशा गगणभेदी घोषणा देत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने वेगळा विदर्भ व शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन सेवाग्राम येथील रेल्वे स्थानकावर तब्बल अर्धातास रेल्वे गाडी रोखून पुन्हा वेगळ्या विदर्भाची मागणी ऐरणीवर आणली. सेवाग्राम मार्गावरील एसटी विभाग नियंत्रक कार्यालयासमोरील एका लॉनमधून भर दुपारी १२.३० वाजता विदर्भ आंदोलनाचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप, मुख्य निमंत्रक राम नेवले, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, महिला आघाडीच्या अध्यक्ष अ‍ॅड. नंदाताई पराते, महिला आघाडी अध्यक्ष पश्चिम विदर्भ संध्याताई इंगोले व युवा आघाडी पश्चिम विदर्भ प्रमुख प्रदीप धामणकर यांच्या नेतृत्त्वात मोर्चाला प्रारंभ झाला. उन्हाची तमा न बाळगता विदर्भातील जिल्ह्यांतून आलेले सुमारे दोन हजारांवर महिला-पुरुष सहभागी होताच मोर्चाला भव्य स्वरुप आले. मोर्चा आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पुलाखालून आगेकूच करीत थेट सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पोहचला. यानंतर काही आंदोलनकर्ते रेल्वे रुळावर आडवे झाले.

नागपूरकडून माल गाडी येताच कार्यकर्त्यांनी त्या दिशेने धाव घेत तिला अर्धा तास रोखून धरले. सुमारे १५ मिनिटानंतर चंद्रपूरकडून आलेली सुपर एक्स्प्रेस सेवाग्राम रेल्वे स्थानकावर थांबली असता तिलाही सुमारे १५ मिनिटे रोखून धरली. दरम्यान, ह्यविदर्भ आमच्या हक्काचा ...ह्ण अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सेवाग्राम रेल्वे स्थानकाचा परिसर व्यापून टाकला होता. कार्यकर्त्यांच्या हातातील विदर्भाचा नकाशा व त्यावर जय विदर्भ नमुद असलेले फलक लक्ष वेधून घेत होते. या आंदोलनाने स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा एकदा बुलंद केली.

या आंदोलनात चंद्रपूरहून माजी विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रभाकर दिवे, वर्धेतून माजी आमदार सरोजताई काशीकर, निळकंठ घवघवे, मधूकर हरणे, गंगाधार मुटे, शैलाताई देशपांडे, उत्तम देवधे, सतीश दाणी, नागपूरहून अरुण केदार, अरविंद देशमुख, धर्मराज रेवतकर, निलकंठ घवघवे, डॉ. दीपक मुंढे, यवतमाळहून विजय निवल, अ‍ॅड. अजय चमेडिया, गडचिरोलीहून राजेंद्रसिह ठाकूर, गोंदियाहून अ‍ॅड. अर्चना नंदघले, अमरावतीहून दिलीप भोयर, वाशिमहून ओमप्रकाश तापडिया असंख्य कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.

आंदोलन अतिशय शांततामय पद्धतीने पार पडले असले तरी रेल्वे स्थानक ते एसटी विभाग नियंत्रक कार्यालय या सुमारे दीड किमी अंतरावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे स्वत: आंदोलनावर नियंत्रण ठेवून होते. आंदोलनाचे स्वरुप विचारात घेता पोलिसांनी सकाळपासूनच सेवाग्राम रेल्वे स्थानक व परिसरात सुमारे ५०० पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये पोलीस अधीक्षक गोयल यांच्यासह पोलीस उपअधीक्षक(गृह) रवींद्र किल्लेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, पोलीस निरीक्षक पराग पोटे, विजय मगर, राजेंद्र शिरतोडे, सहायक पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर ही मंडळी पोलीस ताफ्यासह प्रत्येक घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते. मुंबईहून रेल्वे सुरक्षा विशेष बलाची ७० जवानांची तुकडी तैनात करण्यात आली होती. नागपूरहूनसुद्धा पोलिसांची कुमक मागविण्यात आलीहोती. आंदोलन शांततामय मार्गाने पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वासघेतला.

विदर्भवाद्यांच्या सहा प्रमुख मागण्या- स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरीत निर्माण करा.- शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा.- मायक्रो फायनांसतर्फे कर्जवसुलीसाठी सुरू असलेले महिलांच्या गटाचे शोषण थांबवा.- विदर्भातील तरुणांना महाराष्ट्रातील विदर्भाच्या लोकसंख्येच्या प्रमाणातअधिकार म्हणून शासकीय नोकऱ्या द्या.- महावितरणने केलेली अन्यायपूर्ण १२ टक्केची दरवाढ कमी करा.- ५० टक्के नफ्यासह शेतमालाला किफायतशीर भाव द्या.वेगळा विदर्भ हा केंद्र सूचीतला विषय आहे म्हणून सरळ केंद्राला सरळ निरोप द्यायचे काम झालेले आहे. आता सगळ्या जनतेच्या स्वाधीन हे आंदोलन करतो. आता पुढील जबाबदारी केंद्र सरकारची आहे.- अ‍ॅड. वामनराव चटप, विदर्भ आंदोलनाचे नेते.⁠⁠⁠⁠