शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आरक्षण नियमावलीमुळे रेल्वेला फायदा

By admin | Updated: April 3, 2015 02:23 IST

रेल्वेचे तिकीट आरक्षण ६0 दिवसांच्या ऐवजी १२0 दिवस अगोदर करण्याचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आणि या नियमाचा मोठा फायदा रे

मुंबई : रेल्वेचे तिकीट आरक्षण ६0 दिवसांच्या ऐवजी १२0 दिवस अगोदर करण्याचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आणि या नियमाचा मोठा फायदा रेल्वेला झाला. मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेला एकूण ३६ कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षण करताना मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. यामध्ये दलालांचा हस्तक्षेप असल्यानेच प्रवाशांना तिकीट मिळण्यास समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते. हे पाहता दलालांची रेल्वे आरक्षणातील दलाली रोखण्यासाठी आणि भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ६0 दिवस अगोदर असलेले आरक्षण १२0 दिवस अगोदर करण्याचा निर्णय झाला. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याने प्रवाशांकडून तिकीट आरक्षण मिळविण्यासाठी तिकीट खिडक्यांवर आणि आयआयसीटीच्या वेबसाईटवर एकच झुंबड उडाली. त्यामुळे नव्या आरक्षण नियमावलीच्या पहिल्याच दिवशी देशभरात दुपारी ३ वाजेपर्यंत १0 लाखांपेक्षा अधिक तिकिटांचे आरक्षण झाले. तर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवरही आरक्षण दुप्पट वाढले. १ एप्रिलच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर एकूण ७ लाख १0 हजार प्रवाशांनी तिकीट आरक्षण केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकिटांचे आरक्षण झाल्याने रेल्वेच्या तिजोरीतही घसघशीत रक्कम पडली. या तिन्ही रेल्वे विभागांना मिळून ३६ कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.