शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

महसूल वसुलीमध्ये रायगड जिल्हा सर्वप्रथम

By admin | Updated: April 28, 2016 03:21 IST

रायगड जिल्ह्याने आपला वसुली इष्टांक पार करून २१७ कोटी ५० लाख १२ हजार रुपयांचा एकूण महसूल संकलित के ला आहे.

जयंत धुळप,

अलिबाग-रायगड जिल्ह्याने आपला वसुली इष्टांक पार करून २१७ कोटी ५० लाख १२ हजार रुपयांचा एकूण महसूल संकलित के ला आहे. तब्बल १०२.२५ टक्के यश साध्य करून वार्षिक महसूल वसुलीमध्ये संपूर्ण कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागात सिंधुदुर्ग द्वितीय, पालघर तृतीय, रत्नागिरी चतुर्थ, मुंबई शहर पाचव्या, ठाणे सहाव्या तर मुंबई उपनगर जिल्हा सातव्या स्थानावर आहे.जमीन महसूल, गौण खनिज, करमणूक कर आणि शासकीय कर्ज वसुली यांचा २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता रायगड जिल्ह्याकरिता शासनाने २१२ कोटी ७२ लाख ४७ हजार रुपयांचा इष्टांक दिला होता. जिल्ह्यातील गौण खनिज महसुलातील सर्वात मोठी बाब असणारे रेती उत्खनन जिल्ह्यात बंद असल्याने त्यांतून प्राप्त होणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल या आर्थिक वर्षात प्राप्त झाला नसला तरी जिल्ह्यातील १५ तहसीलदार कार्यालये आणि ८ उप विभागीय महसूल अधिकारी कार्यालये यांनी वर्षभरात विक्रमी महसूल वसुली करून राज्य शासनाने दिलेला इष्टांक पार करून २१७ कोटी ५० लाख १२ हजार रुपयांचा महसूल संकलित करून, तब्बल १०२.२५ टक्के यश साध्य केले असल्याची माहिती रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी सतीश बागल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.रायगड जिल्ह्यातील एकूण आठ महसूल उप विभागांत पनवेल उप विभागाने ५४ कोटी ६२ लाख ९५ हजार रुपयांचा महसूल संकलित करून त्यांना दिलेला इष्टांक पार करून १३२.७७ टक्के महसूल वसूली साध्य केली असून, महसूल वसुलीत प्रथम क्रमांकाचा उप विभाग ठरला आहे. द्वितीय क्रमांकावर पेण उप विभाग असून, १८ कोटी ६९ लाख २० हजार रुपयांची विक्रमी वसुली के ली. त्यांना दिलेला इष्टांक पार करून १२२.६५ टक्के महसूल वसुली केली आहे. अलिबाग उप विभागाने २० कोटी २२ लाख ८६ हजार रुपयांचा महसूल वसूल करून इष्टांक पार करून १०५.८३ टक्के महसूल वसुली केली आणि जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील उर्वरित उप विभागात, महाड उप विभागाने ५ कोटी २५ लाख ५४ हजार (८६.१६ टक्के), कर्जत उप विभागाने २७ कोटी ८७ लाख ३३ हजार (७८.०७ टक्के), रोहा उप विभागाने ७ कोटी ९७ लाख ९३ हजार (५६.१२ टक्के), माणगाव उप विभागाने ४ कोटी ७९ हजार (४८.१८ टक्के), श्रीवर्धन उप विभागाने २ कोटी २ लाख ३८ हजार (३७.३८ टक्के) रुपये महसुलाचे संकलन केले आहे.