शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त अभियंत्याच्या घरांवर छापे

By admin | Updated: June 24, 2016 05:16 IST

बेहिशेबी मालमत्ता (अपसंपदा) संपादित केल्याप्रकरणी कोकण विभागातील पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता संशयित बाळासाहेब भाऊसाहेब पाटील

कोल्हापूर/सोलापूर : बेहिशेबी मालमत्ता (अपसंपदा) संपादित केल्याप्रकरणी कोकण विभागातील पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता संशयित बाळासाहेब भाऊसाहेब पाटील (वय ६२, मूळ राहणार अकलूज, जि. सोलापूर) यांच्या कोल्हापुरातील सहा घरांसह पुण्यातील दोन, सोलापूर जिल्ह्यातील एक अशा एकूण नऊ घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी छापे टाकले.पाटील यांच्या कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील महाडिक माळ, नागाळा पार्क, राजारामपुरी, तोरणानगर व एच. आर. टू ई वॉर्ड येथील घरांवर छापे टाकण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील, तसेच पुण्यातील घोरपडी पेठ आणि शिवाजीनगर येथील घरांवरही छापे टाकण्यात आले. कोल्हापूरचे पो. उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले की, ‘पाटील हे बाळगंगा घोटाळ््यातील संशयित आरोपी आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे निविदा भरून सरकारची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सुमारे ९२ कोटी ६३ लाख रुपयांचा हा घोटाळा आहे. त्यांनी ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा एकूण एक कोटी ५९ लाख ७५ हजार ७६१ रुपयांची अपसंपदा मिळविली आहे. त्यामुळे हे छापे टाकण्यात आले.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी पाटील यांच्यासह संशयित पत्नी शुभलक्ष्मी पाटील, मुलगा उत्कर्ष, हर्षप्रतीक पाटील यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद सोलापूरचे उपअधीक्षक अरुण देवकर यांनी दिली. त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८चे कलम १३ (१), (ई)सह १३ (२)प्रमाणे व भारतीय दंडविधान संहिता कलम १०९ प्रमाणे गुन्हे दाखल झाले.ही आहेत नऊ ठिकाणे...कोल्हापूर : महाडिक माळ, नागाळा पार्क, राजारामपुरी, तोरणानगर, एच.आर.टू ई वॉर्डपुणे : घोरपडी, शिवाजीनगरसोलापूर : सांगोला