शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राज्यातील रेडिओलॉजिस्ट आज संपावर

By admin | Updated: June 14, 2016 03:23 IST

रेडिआॅलॉजिस्टने लिंगनिदान चाचणी केल्याचे कोणतेही सबळ पुरावे नसताना, रेडिलॉजिस्ट, सोनोग्राफी तज्ज्ञांचे मशीन सील करण्याचे प्रकार होत आहेत. याला विरोध करण्यासाठी इंडियन

मुंबई : रेडिआॅलॉजिस्टने लिंगनिदान चाचणी केल्याचे कोणतेही सबळ पुरावे नसताना, रेडिलॉजिस्ट, सोनोग्राफी तज्ज्ञांचे मशीन सील करण्याचे प्रकार होत आहेत. याला विरोध करण्यासाठी इंडियन रेडिओलॉजीकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनने सोमवारी एक दिवसीय राज्यव्यापी संप पुकारला आहे. पुण्यात हा संप बेमुदत असणार आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णांच्या चाचण्या करणार असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत लिंगनिदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई केली जाते. पण, प्रत्यक्षात आॅनलाईन फॉर्म अपूर्ण भरला गेल्याच्या स्थितीतही अनेकदा कारवाई होताना दिसते, असे रेडिओलॉजिस्ट्सचे म्हणणे आहे. त्यामुळे कायद्यात आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी असोसिएशनचे राष्ट्रीय पीसीपीएनडीटी समन्वयक डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत केली. पुण्यातील रेडिओलॉजिस्ट डॉ. आशुतोष जपे यांनी एका गर्भवतीची १९ फेब्रुवारीला सोनोग्राफी केली होती. गर्भाच्या मणक्यात दोष असल्याचे आढळले. महिलेने गर्भपात करुन घेतला. हा गर्भ मुलीचा होता. महापालिकेच्या टीमने ५ एप्रिलला डॉ. जपे यांच्या सेंटरमधील अल्ट्रासाऊंड मशीन ५ तास तपासणी करून सील केले. त्यावेळी ‘एफ’ फॉर्ममधील दोन चुका त्यांनी दाखवल्या. त्यानंतर कारवाई केल्याचे डॉ. ठक्कर यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)रेडिओलॉजिस्टच्या मागण्या निर्दोष डॉ. जपे यांच्यावरील आरोप काढून टाकावा. डॉ. जपे यांच्या मशीनचे सील काढावे.पुणे महापालिकेतील दोषींवर कारवाई करावी.२ हजार रेडिओलॉजिस्ट संपावरमुंबई, पुण्यात सुमारे १ हजार रेडिओलॉजिस्ट संपावर.सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एक्सरे सेवा बंद राहणारदिवसाला एका रेडिओलॉजिस्टकडून १५-२० चाचण्या खासगी, शासकीय रुग्णालयांत भेद का? खासगी सोनोग्राफी सेंटर आणि रुग्णालयांवर कागदपत्रांची पूर्तता न केल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली जाते. पण, शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयांकडून अशा चुका अनेकदा होतात. पण, या शासकीय सेंटरविरुद्ध कारवाई होताना दिसत नाही. हा भेद का? असा सवालही असोसिएशनने केला आहे.डॉ. जपे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे रेडिओलॉजिस्टमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी संप पुकारल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले.