शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनासह रॅडिकोला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2015 02:45 IST

सुखना नदीपात्रातील प्रत्येक किलोमीटरवरील पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी, रॅडिको कंपनीसह त्या पाण्यात मिसळणाऱ्या अन्य सर्व कंपन्यांचे दूषित द्रव्ये शोधून काढावीत,

औरंगाबाद : सुखना नदीपात्रातील प्रत्येक किलोमीटरवरील पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी, रॅडिको कंपनीसह त्या पाण्यात मिसळणाऱ्या अन्य सर्व कंपन्यांचे दूषित द्रव्ये शोधून काढावीत, त्याचा अहवाल दोन आठवड्यांत खंडपीठाला सादर करावा, रॅडिको कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह सर्व संचालक मंडळ, राज्य सरकार, जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळासह पोलिसांना नोटिसा बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे व न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांनी सोमवारी दिले. मद्य निर्मिती करणाऱ्या रॅडिको कंपनीने सुखना नदी व धरणासह परिसरातील शेतात टाकलेल्या घातक रसायनांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी व रॅडिको कंपनी बंद करावी यांसह अन्य मागण्या करणारी जनहित याचिका शेतकरी आत्माराम आसाराम ठुबे व रामेश्वर वैष्णव यांनी खंडपीठात दाखल केली आहे. यााचिकाकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक चिकलठाणा व करमाड यांना अर्ज, तक्रारी केल्या. तहसीलदारांकडून त्या शिवाराची पाहणी झाली. तहसीलदारांचा अहवाल उपरोक्त बाबींची स्पष्ट नोंद करण्यात आलेली असतानाही प्रशासनाने काहीही कारवाई केली नाही.शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, रॅडिको कंपनी तात्काळ बंद करावी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, शेतकऱ्यांनी वारंवार अर्ज -तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक चिकलठाणा व करमाड यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) रॅडिको कंपनीविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी करणारी रिट याचिका विकास कडुबा पाखरे यांनी खंडपीठात दाखल केली आहे. रॅडिकोच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी जिज्ञासाचे कार्याध्यक्ष श्रीकांत रामचंद्र देशपांडे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.