ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या राधे माँला मुंबई हायकोर्टाने दिलासा असून कोर्टाने राधे माँला अटकपूर्व मंजूर केला आहे. आवश्यकतेनुसार राधे माँनी कांदिवाली पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहावे या अटीवर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
मुंबईतील कांदिवली पोलिस ठाण्यात ३२ वर्षीय महिलेने राधे माँ यांच्याविरोधात हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पिडीत महिलेचे कुटुंबीय हे राधे माँचे भक्त असून राधे माँच्या सांगण्यावरुनच त्यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा दावा महिलेने केला होता. तर राधे माँनी हे आरोप फेटाळून लावले होते. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून पिडीत महिलेच्या सासरची मंडळी माझे भक्त असल्याने मलाही या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचे राधे माँ यांनी सांगितले. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी राधे माँने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणी हायकोर्टाने राधे माँला अटकपूर्व जामीन मंजूर केला.