शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

महाड-पंढरपूर रस्त्यावर राडारोडा

By admin | Updated: June 30, 2016 01:48 IST

महाड-पंढरपूर रस्त्यावरील साईडपट्ट्यांना मातीमिश्रीत मुरुम टाकल्याने पावसाच्या पाण्यामुळे माती खचली असून रस्त्यावर राडारोडा झाला आहे.

भोर : महाड-पंढरपूर रस्त्यावरील साईडपट्ट्यांना मातीमिश्रीत मुरुम टाकल्याने पावसाच्या पाण्यामुळे माती खचली असून रस्त्यावर राडारोडा झाला आहे. दुचाकी पडत आहेत, तर चारचाकी रुतून बसत आहेत. तीन-चार दिवसांपासून हे प्रकार सुरू आहे.सार्वजनिक बांधकाम विभा गाकडून माती बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मात्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. या रस्तावर तीन-चार महिन्यांपूर्वी देवघर ते वरंध घाटापर्र्यंतच्या रस्त्यांच्या साईडपट्ट्या खोलवर गेल्यामुळे वाहतुकीस अडचण येत असल्यामुळे त्यात मुरुम भरण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी सुमारे १५ ते २० लाख खर्चही केला होता. मात्र माती-मुरुममिश्रित टाकल्याने रस्त्यावर चिखलाचा राडारोडा झाला आहे. वेणुपुरी गावाजवळचा एक किलोमीटरचा रस्ता नादुरुस्त आहे. >१५ लाख रुपये पाण्यातसार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करण्यासाठी १५ ते २० लाखांचा खर्च करण्यात आला होता. मात्र निकृष्ट काम केल्याने टाकलेली माती पाण्यात वाहून गेली आहे. शासनाचे पैसेही वाया गेले असून प्रवाशांनाही मनस्ताप होत आहे, असे नीरा-देवघर धरणग्रस्त पुनर्वसन विकास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासोा मालुसरे यांनी सांगितले.वाहतूक ठप्परविवारपासून महाड-पंढरपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महाडवरून भोरला येणाऱ्या गाड्या धारमंडप शिळींब पांगारी-पसुरेमार्गे भोरला येत आहेत. इतर आगाराच्या एसटी बस ताम्हणी घाटमार्गे (मुळशी) मधून येत आहेत. शाळा, कॉलेजातील मुलांना दोन दिवसांपासून शाळेत जाता येत नाही, तर अनेकांना कामावरही जाता आले नसल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असल्याचे हिर्डोशीचे उपसरपंच विजय धामुणसे व संदीप धामुणसे यांनी सांगितले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी जे. सी. बी. व ट्रॅक्टरच्या मदतीने चिखल काढण्याचे काम करीत आहेत. सोमवारी रस्ता वाहतुकीस खुला होणार होता, मात्र अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने महाड-पंढरपूर रोडवरील वाहतूक ठप्पच आहे. दोन दिवसांत रस्ता वाहतुकीस खुला होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.