शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

उल्हासनगर महासभेत राडा

By admin | Updated: January 9, 2015 22:57 IST

महापालिका महासभेत अशासकीय प्रस्तावाद्वारे अधिकाऱ्याला उपायुक्तपदी बढती देण्यावरून महासभेत प्रचंड राडा झाला

प्रकाश वराडकर- रत्नागिरी -मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागणाऱ्या वाढीव जमिनीच्या मोजणीचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी दोन्ही जिल्ह्यात १५७२ हेक्टर्स जमिनीची आवश्यकता असून, सध्याच्या महामार्गाची ७९९.४९ हेक्टर्स जागा शासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे चौपदरीकरणासाठी आणखी ७७३ हेक्टर्स जमिनीचे संपादन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी विभागाच्या सुत्रांनी दिली. महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेच्या मोजणीचे काम १२ डिसेंबर २०१४पासून राष्ट्रीय महामार्ग विभाग व भूमी अभिलेखतर्फे सुरू करण्यात आले आहे. मुंबई - गोवा महामार्गातील २०६.३२ किलोमीटर्सचा रस्ता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. या चौपदरीकरणासाठी इंदापूर ते खवटी -ओझरखोल, ओझरखोल ते राजापूर, राजापूर ते झाराप असे टप्पे ठरविण्यात आले आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील मुुंबई - गोवा महामार्गावर मोठे २९, तर छोटे ५८ पूल उभारण्यात येणार आहेत. कशेडी ते ओझरखोल या पहिल्या टप्प्यात १५ मोठे पूल असून, त्यातील १३ नवीन दुपरी होणार आहेत, तर दोन नवीन पूल चारपदरी होणार आहेत. ओझरखोल ते राजापूर या दुसऱ्या टप्प्यात चार मोठे पूल असून, त्यातील एक नवीन चारपदरी, तर तीन नवीन दुपदरी पुलांचा समावेश आहे. राजापूर ते झाराप या तिसऱ्या टप्प्यात १० मोठे पूल असून, हे सर्व चारपदरी होणार आहेत. हे सर्व मोठे पूल ३० मीटर्सपेक्षा अधिक लांबीचे आहेत.३० मीटरपेक्षा कमी लांबीचे ५८ पूल दोन्ही जिल्ह्यात होणार असून, कशेडी ते ओझरखोल या पहिल्या टप्प्यात असे १५ छोटे पूल असून, त्यातील १३ नवीन दुपदरी आणि २ नवीन चार पदरी पुलांचा समावेश आहे.ओझरखोल ते राजापूर या दुसऱ्या टप्प्यात १७ छोटे पूल असून, १२ नवीन चारपदरी, तर पाच नवीन दोन पदरी पुलांचा समावेश आहे. राजापूर ते झाराप या तिसऱ्या टप्प्यात २६ छोटे पूल असून, १२ नवीन चार पदरी, १४ नवीन दोन पदरी पुलांचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. (प्रतिनिधी)मोजणीचे काम सुरू...गेल्या १५ दिवसांपासून महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या वाढीव जागेच्या मोजणीचे काम सुरु झाले आहे. मात्र, कोकणातील अनुभवानुसार मोजणी करणाऱ्यांना विरोधाची झळ गेल्या १५ दिवसातच सोसावी लागली आहे. केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून महामार्ग चौपदरीकरणाचा आराखडा आल्याने अनेक वळणे सरळ करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन संपादनात काही ठिकाणी एकाच बाजूची जागा जाणार आहे. त्याबाबत संबंधित जमीन मालकांकडून काही आक्षेप आल्याने पाली, मराठेवाडी, खानू व अन्य काही भागातील मोजणीचे काम पंचयादी घालून तहकूब ठेवण्यात आले आहे. जमीन मालकांच्या सूचना केंद्र सरकारकडे पाठविल्या जाणार आहेत.