मुंबई : पालिका रुग्णालयाच्या बांधकामावरून भाजपा आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विक्रोळीत राडा झाला. या प्रकरणी पार्क साइट पोलिसांनी भाजपा आमदार राम कदम यांच्या भावासह राष्ट्रवादी नगरसेवकाविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भाजपाकडून दिलीप कदम, डॉ. केणी, त्यांची पत्नी, चालक सुनील चव्हाणसह भाजपाच्या १० ते १५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी नगरसेवक हारुन खान, वॉर्ड अध्यक्ष शंकर वहाडे, अलताफ शेख परवीन बेले यांच्याविरुद्ध क्रॉस केस घेतल्याची माहिती पार्क साइट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)
भाजप आणि राष्ट्रवादीत राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2017 05:41 IST