शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भ्रूणहत्येसाठी औषधे विकणाऱ्यांचे रॅकेट

By admin | Updated: May 19, 2016 01:43 IST

कोणताहा परवाना नसताना भू्रणहत्येसाठीची औषधे विकणाऱ्यास अन्न व औषध प्रशासनाने सापळा रचून पकडले़

पुणे : कोणताहा परवाना नसताना भू्रणहत्येसाठीची औषधे विकणाऱ्यास अन्न व औषध प्रशासनाने सापळा रचून पकडले़ श्रीपाल अमृतलाल जैन (वय ३४, रा़ महावीर सोसायटी, लडकत पेट्रोल पंपाजवळ, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे़ खडक पोलिसांनी त्याला अटक केली असून तपासासाठी न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (औषधे) एस़ टी़ पाटील यांनी सांगितले, की स्त्रीभ्रूणहत्येबाबत औषधावर केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत गर्भपात केंद्रावर वापरली जाणारी अधिकृत औषधे ही बेकायदेशीरपणे राजस्थानी बोलणारा एक जण विकत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानंतर एका राजस्थानी बोलणाऱ्याच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधला व १० किटची मागणी नोंदविली़ त्यानंतर मंगळवारी संपर्क साधला असता त्याने आपण आता मुंबईत असल्याचे सांगितले़ तेव्हा आजच औषधे पाहिजेत, आपल्या पत्नीचा गर्भपात करायचा असल्याचे या मध्यस्थाने सांगितले़ त्या वेळी त्याने तुम्ही पीएमपी बसस्टॉपवर थांबा मी माणूस पाठवितो, असे सांगितले़ त्याप्रमाणे भवानी पेठ परिसरात सापळा रचला़ श्रीपाल जैन हे औषधे घेऊन आले़ त्यांनी औषधे देऊन पैसे घेताच छापा घालून त्यांना पकडण्यात आले़याप्रकरणी औषध निरीक्षक शामल महिंद्रकर यांनी फिर्याद दिली आहे़ जैन यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले़ स्त्रीरोगतज्ज्ञाच्या देखरेखीखाली व त्यांच्या शिफारशीने वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री कोणत्याही परवान्याविना करून कायद्याचा भंग केला आहे़ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कॉम्बीपॅक आॅफ मिफ्रीस्टोन अँड मिसोप्रोस्टोल टॅबलेटस, गेस्टाप्रो या औषधांची विक्री केली़ ही औषधे फक्त शासनाच्या अधिकृत गर्भपात केंद्रावर मिळत असताना त्यांच्याकडे कोठून आली़ त्याच्या साथीदारांची माहिती घेऊन त्यांना अटक करायची आहे़ याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील संध्या काळे यांनी कोठडीची मागणी केली़ न्यायालयाने ती मंजूर केली़