शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी समितीच्या कार्यकक्षेवर खडसेंचा आक्षेप

By admin | Updated: February 27, 2017 16:47 IST

झोटींग समितीने शासनाच्या निश्चित केलेल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी केली. यावर आक्षेप नोंदवित चौकशीत

ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 27 - झोटींग समितीने शासनाच्या निश्चित केलेल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी केली. यावर आक्षेप नोंदवित चौकशीत नव्याने काही मुद्यांचा समावेश करण्याचा अर्ज माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या वतीने समितीला दिल्याची माहिती आहे. दरम्यान सोमवारी समितीकडून विचारणा करण्यात आलेल्या काही मुद्यांवर खडसेंकडून बगल देण्यात आली असून उद्यामंगळवारला पुन्हा सुनावणी होणार आहे.महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करून पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागा आपल्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती झोटींग समिती गठित करण्यात आली. समिती गेल्या आठ महिन्यापासून चौकशी करीत आहे. जागेशी संबंधित महसूल आणि एमआयडीसीकडून कागदपत्र समितीने तपासले. त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागविण्यात आले. एमआयडीसीकडून साक्ष, पुरावे सादर करण्यात आले. चौकशीसाठी खडसेंना समितीने हजर राहण्याचे आदेश दिले. यापूर्वी खडसेंनी जमिनीच्या व्यवहाराबाबत आपला संबंध नसल्याची साक्ष समितीसमक्षदिल्याचे एमआयडीसीचे वकिल चंद्रशेखर जलतारे यांनी सांगितले. खडसेंनी पूर्वीच्या पवित्र्यापासून घुमजाव केल्याचेही त्यांचे म्हणणे होते. दरम्यान सोमवारी पुन्हा समितीसमक्ष सुनावणी झाली. समितीकडून अनेक प्रश्न खडसेंना विचारण्यात आले. यातील काही प्रश्नांवर खडसेंकडून टाळाटाळीचे उत्तर दिल्याचे सूत्रांकडून समजते. समितीने चौकशी करताना शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या मुद्यांव्यतिरिक्तही अनेक मुद्यांवर तपास केला.यावर खडसेंनी आक्षेप घेत नव्याने काही मुद्यांचा समावेश करण्याचा अर्ज दिला. खडसेंच्या अर्जावर लेखी आक्षेप घेतल्याची माहिती एमआयडीसीचे वकील जलतारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. समितीला आणखीही काही प्रश्नांचा खुलासा करायचा आहे. त्यामुळे आता मंगळवारला पुन्हा सुनावणी होणार आहे. मंगळवारची सुनावणी अंतिम ठरवण्याशी शक्यता आहे. त्यानंतर समिती अहवालतयार करून शासनाला पाठविणार असल्याचे सूत्रांकडूून सांगण्यात येते.