शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मणप्पुरम गोल्ड’वर दरोडा

By admin | Updated: September 29, 2016 00:57 IST

उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरात मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर सहा जणांनी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकून ३१ किलो ७४१ ग्राम सोन्याचे दागिने लुटून नेले.

नागपूर : उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरात मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर सहा जणांनी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकून ३१ किलो ७४१ ग्राम सोन्याचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे पोलीसही हादरले आहेत. दरोडेखोरांच्या शोधार्थ उपराजधानीत सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.जरीपटका मुख्य मार्गावरील भीम चौकात कुकरेजा कॉम्प्लेक्स आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मणप्पुरम गोल्डचे कार्यालय आहे. बुधवारी दुपारी ४.१५च्या सुमारास कार्यालयात तीन कर्मचारी व सहा ग्राहक होते. त्यावेळी सहा जण आत शिरले व त्यापैकी चार जणांनी आपल्याकडील पिस्तुल काढून सर्वांना धमकावले. त्यानंतर लॉकर रुममध्ये जाऊन त्यांनी लॉकरमधून ३१ किलो ७४१ ग्राम सोन्याचे दागिने आणि ३ लाख रुपये लुटले. या दागिन्याची एकूण किंमत ५ कोटी ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.त्यानंतर लॉकर रूममधून ग्राहक व कर्मचाऱ्यांना कोंडून तसेच त्याआधी सर्वांकडून मोबाईल हिसकावून ते पसार झाले. हा प्रकार जवळपास २५ मिनिटे सुरू होता. यादरम्यान कर्मचाऱ्यांनी लॉकरची तार कापून सायरन वाजविला. या कार्यालयात बऱ्याचदा अकारण सायरन वाजला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी एक ग्राहक दागिने सोडविण्यासाठी तेथे पोहोचला. त्याने दार उघडून सर्वांची सुटका केली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)