शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे रॅकेट उध्वस्त

By admin | Updated: July 21, 2016 10:03 IST

हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालविणाऱ्या कुख्यात कल्याणी देशापांडेचे आणखी एक सेक्स रॅकेट उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे

ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 21 - हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणाऱ्या कुख्यात कल्याणी देशापांडेचे आणखी एक सेक्स रॅकेट उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोथरुडच्या उच्चभ्रू भागात चालणाऱ्या या वेश्या व्यवसायातून मुंबईच्या तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
 
रवी शिवाजी तपासे (वय 28, रा.फ्लॅट नं ३, शिवालय सोसायटी, डावी भुसारी, पौड रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलींमध्ये मालाडच्या 19 वर्षीय, कांदिवलीच्या 24 वर्षीय तर न्यू पनवेलच्या 22 वर्षीय मुलीचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांना भुसारी कॉलनीमध्ये राहणा-या कल्याणी देशपांडे तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) राधिका फडके यांनी पथकासह छापा टाकून कारवाई करीत तीन सज्ञान मुलींची सुटका केली.
 
कल्याणी देशपांडे हिच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यात 22 गुन्हे दाखल आहेत. 1998 पासून ती या बेकायदा व्यवसायात सक्रिय आहे. तिच्यावर डेक्कन, कोथरूड, विश्रांतवाडी, चतु:शृंगी, हिंजवडी आणि हवेली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अनेक नामी गुंडांसोबत तिचे संबंध असून तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही अनेकदा करण्यात आली आहे.