शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करणार

By admin | Updated: June 10, 2014 01:05 IST

राज्यात महायुतीची सत्ता आल्यास महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करू व येथे मुंबईकरांसठी भव्य उद्यान उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली़

उद्धव ठाकरे : फोडला प्रचाराचा नारळमुंबई : राज्यात महायुतीची सत्ता आल्यास महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करू व येथे मुंबईकरांसठी भव्य उद्यान उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली़इंडियन मर्चन्टस् चेम्बरच्या वतीने विकास महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन चर्चगेट येथील मुख्य इमारतीत करण्यात आले होते़ त्यावेळी उद्धव यांनी ही घोषणा करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला़ते म्हणाले, रेसकोर्सच्या कराराची मुदत आता संपली आहे़ त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर आम्ही हा भूखंड ताब्यात घेऊ़ येथे मुंबईकरांसाठी भव्य उद्यान उभारू . मुंबईला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी हे उद्यान एक आकर्षण ठरेल. सध्या येथे अस्तित्वात असलेला घोडे बाजार आम्ही मुंबईबाहेर हलवू़ ज्यांना शौक पूर्ण करायचे असतील ते कोठेही जाऊन करतील़ मुंबईच्या मध्यवर्ती असलेला हा सव्वा दोनशे एकर भूखंड केवळ मुंबईकरांसाठीच वापरला जाईल़ येथे टेलबलँड असल्याने उद्यान उभारताना फारसा खर्च येणार नाही़ येथे नवीन झाडे लावली जातील़ मुंबईकर येथे हक्काने येथील, असेही उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केले़दरम्यान, रेसकार्ससोबत मुंबईतील वाहतुकीच्या कोंडीलाही उद्धव यांनी यावेळी सागरी मार्गाचा पर्याय सुचवला़ ते म्हणाले, मुंबईत इमारतींना एफएसआय मिळतो़ पण रस्त्यांना नाही़ आता मुंबईतील रस्ते वाढवणे शक्य नाही़ त्यामुळे सागरी किनार्‍यांकडून मुक्त मार्ग बांधणे हा यावर उत्तम तोडगा आहे़ या मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीची कोंडी निश्चितच कमी होईल़ मात्र हा मार्ग तयार करत असताना कोळी बांधवांच्या रोजगारावर किंवा त्यांच्या घरांवर कोणतीही गदा येणार नाही याची काळजी घेतली जाईल़महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलताना त्यांनी शिक्षणावर अधिक जोर दिला़ ते म्हणाले, मुंबईत आम्ही व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले़ याने चारशे शाळा जोडल्या़ या चारशे शाळांतील विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकाच शिक्षकाला शिकवणे शक्य झाले़ राज्यात महायुतीची सत्ता आल्यास अशाच प्रकारचे व्हर्च्युल क्लास रूम आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू करू़ कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शहरात येऊन चांगले शिक्षण घेणे परवडत नाही़ पण या माध्यमातून आम्ही उत्तम शिक्षणाची दारे ग्रामीण भागासाठीही खुली करू़यावेळी उद्धव यांनी उद्योजकांनाही महायुतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले़ ते म्हणाले, याआधीचे केंद्रातील सरकार हे उद्योजकांना पोषक नव्हते़ मात्र आताचे सरकार हे उद्योजकांना पाठबळ देणारे आहे़ महाराष्ट्रातही महायुतीची सत्ता आल्यास आम्ही उद्योजकांना नक्कीच सहकार्य करू़ कारण आमचे सरकार हे आमचे नसून, आपले सरकार असणार आहे़ तेव्हा उद्योजकांनाही महायुतीला तेवढेच सहकार्य करावे़ कारण माझा उद्योगांना विरोध नाही़ मी मुख्यमंत्री व्हावे, अशी तुमची असेल़ पण आता मी याबाबत काहीच बोलत नाही़ केवळ तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो, असेही उद्धव यांनी उद्योजकांना सांगितले़यावेळी उद्धव यांनी सत्ता आल्यानंतर एक लाख पोलीस भरती, जलदगती न्यायालये, ग्राहक हिताचे रक्षण, २५ हजार मेगावॉट वीज उत्पादन अशा घोषणा केल्या़जैतापूरला विरोध कायमजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला आमचा विरोध असून तो नवनिर्वाचीत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कळविण्यात आला आहे़ त्यांनीही या प्रकरणाचा आढावा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केल्याचे उद्धव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़