शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कुरेशींचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

By admin | Updated: December 22, 2014 04:59 IST

भाजपाचे स्थानिक प्रवक्ते डॉ. सुरेश येवले यांनी प्रभाग क्र. ३२ मधील काँग्रेसचे नगरसेवक फरीद कुरेशी हे इतर मागासवर्गीय नसल्याच्या दावा केला होता.

भाईंदर : भाजपाचे स्थानिक प्रवक्ते डॉ. सुरेश येवले यांनी प्रभाग क्र. ३२ मधील काँग्रेसचे नगरसेवक फरीद कुरेशी हे इतर मागासवर्गीय नसल्याच्या दावा केला होता. त्यावर कोकण विभागीय जात पडताळणी समितीद्वारे घेण्यात आलेल्या सुनावणीनुसार त्यांचे प्रमाणपत्र रद्द केल्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता यावर पालिका प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.आॅगस्ट २०१२ मध्ये झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ३२ मधुन काँग्रेसचे फरीद कुरेशी हे विजयी ठरले. त्यावेळी त्यांनी भाजपाच्या डॉ. सुरेश येवले यांना पराभूत केले. ही जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने कुरेशी यांनी कोकण विभागीय जात पडताळणी समितीकडून २३ जुलै २०१२ ला रीतसर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून ते निवडणूक प्रशासनाला सादर केले. त्यावर येवले यांनी आक्षेप घेत कुरेशी हे इतर मागास प्रवर्गातील नसल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर ३१ जानेवारी २०१४ रोजी झालेल्या सुनावणीत न्या. अभय ओक व न्या. एम. सोनक यांच्या खंडपीठाने संबंधित याचिकेवर दोन्ही बाजूंच्या दावेदारांनी फेब्रुवारी २०१४ ला कोकण विभागीय जात पडताळणी समितीकडे सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. नव्याने घेण्यात येणाऱ्या सुनावणीवर पुढील ४ महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने समितीला दिले होते. त्यानुसार समिती क्र. १ चे अध्यक्ष गौतम रसाळ, सदस्य राजेंद्र गोसावी व सदस्य सचिव सलीमा तडवी यांच्यापुढे १८ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी घेण्यात आली. त्यात याचिकाकर्ते येवले यांच्या बाजूने अ‍ॅड. चिंतामणी भनगोजी तर कुरेशी यांच्या बाजुने अ‍ॅड. माळी यांनी युक्तिवाद केला. १२ डिसेंबरला दिलेल्या आदेशात, इतर मागास प्रवर्गात दाखविलेली कुरेशी ही जात सिद्ध होत नसल्याचे नमूद करुन त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचा निर्वाळा दिला. (प्रतिनिधी)