शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल मंदिरात पत्राशेड मधील रांग 6 तास थांबली, भाविकांमध्ये रोष

By admin | Updated: July 3, 2017 01:30 IST

पंढरपूरच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून भक्तगण दर्शनासाठी पंढरीत पोहचले असून, विठ्ठलाचे दर्शन 24 तास सुरू

 शहाजी फुरडे-पाटील/ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 3 - पंढरपूरच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून भक्तगण दर्शनासाठी पंढरीत पोहचले असून, विठ्ठलाचे दर्शन 24 तास सुरू असले तरी दर्शनरांग रविवारी रात्री गोपाळपुरच्या पुढे  इंनजिनिअरिंग कॉलेजपर्यंत पोहचण्यास सुरुवात झाली आहे. मंदिरात अचानक दुरुस्तीचे काम काढल्यामुळे पत्रा शेड मधील लाईन तब्बल पाच ते सहा तास झाले पुढे न सरकल्याने दर्शनरांगेतील भाविकानी वैतागुन रात्री बाराच्या दरम्यान एकत्र येत प्रशानाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल रोष व्यक्त केला.मुळातच मंदिरात दर मिनिटाला केवळ 30 ते35 भाविकांचे दर्शन होत आहे, त्यामुळे लाईन लांब गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापूजेसाठी येणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर आंदोलक त्यांच्या जवळ पोचवू नयेत म्हणून विठ्ठल मंदिरात प्रशासनाने अचानक वेल्डिंग चे काम काढल्यामुळे दर्शन रांग थांबली आहे. याचा परीणाम पत्रा शेड मधील भाविक वैतागले आहेत. लाईन जर पाच-सहा तास एकाच जाग्यावर थांबणार असेल तर आमचे दर्शन कधी होणार असा सवाल ते करीत आहेत. या बरोबरच या पत्रा शेड मध्ये भाविकांना कोणत्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. यातील कांही भाविक हे पंधरा तास झाले लाईन मध्ये उभे आहेत, त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याची ही मोठी अडचण झाली आहे.या भाविकांनी रात्री बारा वाजता पत्रा शेडची जबाबदारी असलेल्या तहसीलदार संजय पाटील यांच्या समोर एकत्र येऊन आम्ही विठ्ठलासाठी आलो आहोत, आम्हाला मुख्यमंत्र्याचे काही देणे-घेणे नाही. त्यात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस  बाहेर सोडत नाहीत आणि सोडलेच तर पुन्हा आत घेत नाहीत.रात्री सव्वा बारा वाजता आयपीएस अधिकारी निखिल पिंगळे यांनी पत्रा शेडला भेट देऊन भाविकांच्या  भावना व अडचणी जाणून घेतल्या.