शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे जगावं की मरावं हा सवाल - नाना पाटेकर यांची खंत

By admin | Updated: March 6, 2016 01:02 IST

जगावं की मरावं, हा एकच सवाल सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. कर्जमाफीने त्यांच्या समस्या मिटणार नाहीत. त्यांना शेतीसाठी केवळ वीज, पाणी आणि शेतीमालाला हमीभाव हवा आहे.

पुणे : जगावं की मरावं, हा एकच सवाल सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. कर्जमाफीने त्यांच्या समस्या मिटणार नाहीत. त्यांना शेतीसाठी केवळ वीज, पाणी आणि शेतीमालाला हमीभाव हवा आहे. शेती टिकवायची असेल, तर पाणी अडवण्यापेक्षा ग्रामीण भागातील मुलांसाठी ‘अडवा आणि जिरवा’ योजना अमलात आणली पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. सिंबायोसिस स्पोटर््स सेंटरतर्फे क्रीडाभूषण पुरस्कार रायफल शूटर दीपाली देशपांडे यांना पाटेकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी अस्थिरोगतज्ज्ञ पराग संचेती, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरचे मानद संचालक डॉ. सतीश ठिगळे आदि मान्यवर उपस्थित होते.पाटेकर म्हणाले, ‘कारण, आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे. पारंपरिक शेतीने आता शेतक-यांचे भले होणार नाही. नाम फाऊंडेशनच्या निमित्ताने सुख- दु:खाच्या ख-या व्याख्या समजू लागल्या आहेत. राजकारण्यांना नावे ठेवण्यात वेळ वाया न घालवता शेतक-यांना मदत करण्याच्या निमित्ताने मरेपर्यंत जगण्यासाठी एक कारण मिळाले आहे.’अभिनेत्याच्या मनातील भावनांचा कल्लोळ शब्दबध्द करताना नाना पाटेकर म्हणाले, ‘खेळामध्ये भावना बाजूला ठेवाव्या लागतात. अभिनेता मात्र इतरांच्या भावना, दु:खे घेऊन जगत असतो. त्याला स्वत:च्या भावना बाजूला ठेवाव्या लागतात. अभिनेत्याचा प्रवास हा अश्वत्थाम्यासारखा असतो. प्रत्येक देशाची भावनिक आंदोलने वेगवेगळी असतात. पण, आपण जसे आहोत, तसेच राहणारा नट खरा कलाकार असतो. कारण, अभिनय एका चौकटीत बांधील राहू शकत नाही. त्याची लाटच आली पाहिजे. मुजुमदार म्हणाले, ‘जगण्यासाठी श्रीमंती नव्हे तर दिलदार ह्रदय लागते. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेकांचे अश्रू पुसायला मदत होईल.’नानांच्या पुण्यकार्यात खारीचा वाटा म्हणून सिंबायोसिसच्या वतीने नाम फाऊंडेशनला दहा लाखांचा तसेच संजीवनी मुजुमदार यांच्या वतीने वैयक्तिक एक लाख रुपयांचा निधी सुपूर्त करण्यात आला. यावेळी दीपाली देशपांडे म्हणाल्या, ‘‘२०२० नंतरच्या आॅलिंपिकमध्ये प्रत्येक विभागात भारताला किमान एक पदक मिळावे, अशी माझी इच्छा आहे. त्यादृष्टीने लक्ष्य फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण घेण्याचे काम सुरु आहे.’’यावेळी ज्ञानदा तायडे या विद्यार्थिनीने आपल्या खाऊचे पैसे वाचवून नाम फाऊंडेशनसाठी धनादेश दिला. स्वाती दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)