शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नागरी निवारातील सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न सुटला

By admin | Updated: July 13, 2017 02:10 IST

गोरेगाव(पूर्व) नागरी निवारा येथील बाराशे सदनिकाधारकांचा सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न अखेर सुटला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव(पूर्व) नागरी निवारा येथील बाराशे सदनिकाधारकांचा सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न अखेर सुटला आहे. राज्य सरकारने अलीकडेच याबाबत शासकीय आदेश काढत सदनिकाधारकांचा प्रश्न मार्गी लावला. नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात आलेला नागरी निवारा हा यशस्वी गृहनिर्माण प्रकल्प आहे. येथील बाराशेहून अधिक सदनिकांची खरेदी-विक्री झाली होती. मात्र, जाचक अटींमुळे येथील सदनिकांचे हस्तांतरण रखडले होते. विशेषत: जिथे मूळ सदनिकाधारकांनी विक्री केली. त्यानंतर स्थलांतर किंवा अन्य कारणांमुळे ते उपलब्ध नाहीत अशा प्रकरणात मोठी अडचण निर्माण झाली होती. या प्रकरणी आमदार सुनील प्रभू यांनी कृती समितीला बरोबर घेऊन सातत्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोर विषय मांडला. शिवाय, विधानसभेत विविध आयुधं वापरून हा प्रश्न मांडला होता. या प्रश्नाविषयी नागरी निवारा पुनर्खरेदी सदनिकाधारक कृती समितीच्या वतीने खासदार गजानन कीर्तिकर, आमदार प्रभू, माजी नगरसेवक सदाशिव पाटील, विधि समिती अध्यक्ष अ‍ॅड. सुहास वाडकर, शाखाप्रमुख संदीप जाधव यांनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. समितीच्या वतीने शैलेश पेडामकर, मनोहर जाधव, दिलीप कांबळी, गणपती राजगिरे, विजय साळसकर, संजय पालव, राजेंद्र खामकर, प्रवीण तेली, नीलेश मुणगेकर, नितीन मोहिते यांनी पाठपुरावा केला.