शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक स्थळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 7, 2017 01:28 IST

ऐतिहासिक व वैभवशाली अशा दुहेरी सोनेरी इतिहासाची साक्ष असणारा वसई तालुका पुरातत्व विभागाच्या दृष्टीने दुर्लक्षणीय ठरला

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : ऐतिहासिक व वैभवशाली अशा दुहेरी सोनेरी इतिहासाची साक्ष असणारा वसई तालुका पुरातत्व विभागाच्या दृष्टीने दुर्लक्षणीय ठरला आहे. राज्य पुरातत्व व केंद्रीय पुरातत्व विभाग मिळून वसई तालुक्यातील केवळ ५ स्मारके, वास्तू पुरातत्व विभागाच्या संरक्षित यादीत येतात. केंद्रीय पुरातत्व विभागात सोपारा स्तूप, बुरूडकोटÞ, सोनारभाट, गासÞटाकी, उमराळे बोळींज़, वसई किल्ला, अर्नाळा किल्ला यांचा समावेश होतो. प्रत्यक्षात या संरक्षित वास्तूंची संख्या मोजकीच असली तरीही त्याच्या संवर्धनाची बोंबाबोंब कायमच आहे. वसई तालुक्यात २०० हून अधिक ऐतिहासिक स्थानी प्राचीन मूर्त्या समाधी किल्ले आहेत. यातील बरेच अवशेष अत्यंत विखुरलेल्या व बिकट अवस्थेत शेवटचे क्षण मोजत आहेत.या वास्तूंचे संवर्धन कधी व कोण करणार हा प्रश्न आहे. यातील बरेच अवशेष इतिहासाची साक्ष आहेत.ऐतिहासिक कागदपत्रांतून डोकावणारी ही गावे व त्यातील वैशिष्टयपूर्ण अवशेष संकलित करणे काळाची गरज आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या विखुरलेल्या इतिहासाच्या खूणा जपण्यासाठी पुरातत्व विभागाने ५० वर्षे वाया घालवली आहेत. येत्या काळात पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकां व्यतिरिक्त इतर स्मारके आणि वास्तू , जतन करणारी अशी कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही. आणि पुढे होईल, अशी चिन्हेही दिसत नाहीत. यामुळे वसई तालुक्याच्या ऐतिहासिक अवशेषांचे भवितव्य अंधकार:मय आहे. वसई तालुक्याच्या प्रदीर्घ इतिहासात बिंब  ञैकुट, अभिर, मौर्य, राष्ट्रकुट, चालुक्य शिलाहार, सातवाह़न, मौर्य, पोर्तुगीज, ब्रिटीश, मराठे इत्यादी राजवटी होऊन गेल्यात वसई तालुक्यातील प्रत्येक गावागावांत असणारे किल्ले , मूर्त्या, लेणी, समाधी,  नाणी, वास्तु स्मारके, शिला लेख इत्यादींचे संशोधन व संवर्धन होणार तरी कधी? ते तत्परतेने झाल्यास सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक इतिहास संकलनास व संशोधनास एक नवीन दिशा उपलब्ध होईल. ज्या व्यक्ती आणि संस्था यांना इतिहास संशोधन व संवर्धनात स्वारस्य आहे. त्यांची सातत्यपूर्ण मदत पुरातत्व खात्याने घेतल्यास या कामाला गती मिळू शकते. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा ठाम संकल्प व निर्णय घेण्याची आज आवश्यकता आहे, असे किल्ले वसई मोहीमेचे श्रीदत्त राऊत यांनी लोकमत न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.