शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही; तर खासदारकी काय चाटायची काय? - राजू शेट्टी

By admin | Updated: May 19, 2016 19:19 IST

कांद्याला किमान १५ रुपये किलो हमीभाव द्या, अन मग काय रामराज्य करायचं ते करा, असा राज्य व केंद्र सरकारला टोला मारून शेतकऱ्यांचे प्रश्न भिजत राहिले; तर खासदारकी काय चाटायची काय

चाकण येथे रास्ता रोको : शेतकऱ्यांनी महामार्गावर ओतला कांदा; ५ किलोमीटरवर वाहनांच्या रांगाचाकण : कांद्याला किमान १५ रुपये किलो हमीभाव द्या, अन् मग काय रामराज्य करायचं ते करा, असा राज्य व केंद्र सरकारला टोला मारून ह्यशेतकऱ्यांचे प्रश्न भिजत राहिले; तर खासदारकी काय चाटायची काय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी चाकण येथे केला. कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी चाकण येथे गुरुवार (दि. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी खासदार राजू शेट्टी बोलत होते. शेतकऱ्यांनी संतप्त होऊन कांदा महामार्गावर ओतून दिला. या आंदोलनामुळे अर्धा तास महामार्गावर दोन्ही बाजूला ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

राजू शेट्टी म्हणाले, की १९८० च्या दशकात शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली व शेतकऱ्यांचे संघटन करून कांद्यासाठी आंदोलन केले. ३५ वर्षांनंतरही शेतमालाच्या भावासाठी शेतकऱ्यांना वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे. शेतमालाचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने जीवनावश्यक वस्तू १९५५ च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झाला. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले की सरकार हस्तक्षेप करते. पाकिस्तानहून ४० रुपये किलोने कांदा आयात करून शासन येथील शेतकऱ्यांना मातीत घालते, म्हणजे शेतकरी हा पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू आहे काय? असा सवाल त्यांनी केला.

या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकऱ्यांनी कांद्याला हमीभाव मिळण्याबाबतचे निवेदन मंडलाधिकारी राजाराम मोराळे यांच्याकडे दिले. या आंदोलनात प्रामुख्याने जयप्रकाश परदेशी, दिनेश मोहिते, अनिल देशमुख, गुलाब गोरे, राम गोरे, बाबासाहेब पवार, काळूराम कड, धीरज परदेशी, चंद्रकांत गोरे, बाजीराव जाधव, दशरथ काचोळे, किसन गोरे आदी शेतकरी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.चौकटघामाच्या थेंबा थेंबाचा हिशेब द्याराज्यकर्ते धोरण बनवतात, शेतमाल स्वस्तात देऊन सर्वसामन्यांचा बळी देतात. भीक नको, पण आमच्या घामाच्या थेंबा थेंबाचा हिशेब द्या. कांदा उत्पादनाचा खर्च किलोस १३ रुपये येत असून, सरकार कांद्याला ३ रुपये ते ६ रुपये भाव देत असेल, तर शेतकऱ्याने कर्ज कसे फेडायचे? उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची ग्वाही सरकारने दिली होती, म्हणून कांद्याला किमान १५ रुपये हमीभाव मिळाला पाहिजे व प्रत्येक बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करावे, असे राजू शेट्टी या वेळी म्हणाले.शेतकरी गळफास घेतात; सरकारला लाज वाटली पाहिजेदेशात गरजेपेक्षा कांद्याचे उत्पादन जास्त झाले असून, जगभर व देशात मंदीची लाट आहे. उद्योजकांनी १ लाख २५ हजार कोटी कर्ज थकविले म्हणून बँकिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. उद्योजकांना वसुलीचा तगादा लावू नये, म्हणून बँकांना २५ हजार कोटी दिले जातात आणि लाख मोलाचा ७/१२ गहाण ठेवून १० हजार कर्ज देताना लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्याने कर्ज थकविले, तर नोटीस फलकावर नाव लावता, त्यांच्या जमिनी लिलाव करून विकता, याचा निषेध केला पाहिजे. कांदा खाल्ला नाही म्हणून कुणी तडफडून मेला नाही, पण कांद्याला २/४ रुपये भाव मिळाला म्हणून कर्ज फेडता आले नाही, म्हणून शेतकरी गळफास घेतात, याची सरकारला लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली.