शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारच्या २९ गावांचा प्रश्न टांगणीला

By admin | Updated: December 12, 2015 02:13 IST

गेले काही महिने वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमधून २९ गावे वगळण्याबाबतचा निर्णय सरकारने अधांतरी ठेवला आहे. उच्च न्यायालयाने आॅक्टोबर महिन्यातच राज्य सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता

मुंबई : गेले काही महिने वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमधून २९ गावे वगळण्याबाबतचा निर्णय सरकारने अधांतरी ठेवला आहे. उच्च न्यायालयाने आॅक्टोबर महिन्यातच राज्य सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. मात्र अद्याप या गावांबाबत राज्य सरकारने काहीच निर्णय घेतला नसून, ३१ डिसेंबरपर्यंत ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतून २९ गावे वगळण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम होते आणि तसा शासन निर्णयही काढला. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला त्यांच्या भूमिकेवर फेरविचार करण्यासाठी काही आठवड्यांची मुदतही दिली. तरीही राज्य सरकार गावे वगळण्याच्या भूमिकेवर ठाम होते. मात्र आॅक्टोबरमध्ये अचानकपणे राज्य सरकारने भूमिकेवरून ‘यू-टर्न’ घेतला. २९ गावे वगळण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांची मुदत मागितली. उच्च न्यायालयाने राज्य सरकारची विनंती मान्य केली.शुक्रवारच्या सुनावणीवेळी अ‍ॅड. वग्यानी यांनी कोकण विभागीय आयुक्तांनी १० डिसेंबर रोजी सरकारपुढे अहवाल सादर केला असल्याची माहिती खंडपीठाला दिली. अहवाल सादर केला असला तरी सरकारला त्यावर अभ्यास करायचा आहे. अधिवेशनामुळे अभ्यास करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे आता ३१ डिसेंबरलाच वसई-विरारच्या माहपालिकेतून २९ गावे वगळायची की ठेवायची याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे खंडपीठाला सांगितले.