शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानच्या राणीचा ‘साज’ उतरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 04:44 IST

माथेरानची राणी अशी ओळख आणि पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली मिनी ट्रेन सध्या गर्दुल्ले आणि दारुड्यांचा अड्डा बनत चाललेली आहे.

मुंबई : माथेरानची राणी अशी ओळख आणि पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली मिनी ट्रेन सध्या गर्दुल्ले आणि दारुड्यांचा अड्डा बनत चाललेली आहे. मे २0१६पासून मिनी ट्रेन बंद असल्याने, या ट्रेनचे डबे नेरळमधील स्थानकातच उभे करण्यात आले. मात्र, मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षामुळे, माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या या ट्रेनचे सौंदर्य झाकोळले आहे. या दुर्लक्षामुळेच सध्या मिनी ट्रेनच्या डब्यात दारूच्या बाटल्या, सिगारेटचा खच पडलेला पाहून, गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या देखभालीकडे लक्षच दिले नसल्याचे दिसते. माथेरानची मिनी ट्रेन रुळावरून घसरण्याच्या सलग दोन घटना २0१६मधील एप्रिल महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीला घडल्या. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. यानंतर, रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सुरक्षा उपाय योजण्यासाठी चार सदस्यांच्या एक स्वतंत्र समितीचीही स्थापना करण्यात आली. या समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालातून मिनी ट्रेनमध्ये सुधारणा करण्याबरोबरच प्रवाशांसाठी सुरक्षेचे उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. समितीने सादर केलेल्या अहवालात एअर ब्रेक बसवितानाच घाट सेक्शनमध्ये ६५0 मीटरची भिंतही बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आणि तो मंजुरीही झाला. त्यानंतर, सुरक्षा उपाययोजना करून माथेरान मिनी ट्रेन सुरू केली जाईल, असे वारंवार आश्वासन मध्य रेल्वेकडून देण्यात आले. तरीही अजूनही जैसे थेच परिस्थिती आहे. मिनी ट्रेन सुरू न झाल्याने, या ट्रेनचे काही डबे नेरळ स्थानकातच उभे करण्यात आले. मात्र, डबे उभे केल्यानंतर त्याकडे गेले अनेक महिने रेल्वे अधिकारी फिरकलेच नसल्याचे दिसून आले. सध्या मिनी ट्रेनच्या डब्यांची दुरवस्था झाली असून, डब्यांचे दरवाजे तुटले आहेत. डब्यांमध्ये अक्षरश: दुर्गंधीचे साम्राज्य आहे. दारूच्या बाटल्या आणि सिगारेटचा अक्षरश: खच पडलेला, तर पान खाऊन ठिकठिकाणी थुंकण्यात आलेले आहे, तसेच हे डबे गर्दुल्ले, दारुडे यांचा निवाराच बनल्याचे दिसते. एकंदरीतच मिनी ट्रेनच्या डब्यांची दुरवस्था पाहून पर्यटकांना एकच प्रश्न पडतो की, या पुढे ट्रेन धावणार की नाही? (प्रतिनिधी)