शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कवाडेंना रोखले; आठवलेही थांबले!

By admin | Updated: July 24, 2016 03:12 IST

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी मुंबईतून निघालेल्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंना त्यांचा नियोजित दौरा अचानक रद्द करावा लागला

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी मुंबईतून निघालेल्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंना त्यांचा नियोजित दौरा अचानक रद्द करावा लागला तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनाही पोलिसांनी कोपर्डीत जाण्यास मज्जाव केला़ दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनाही कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलिसांनी अडविले होते़ गुरुवारी आंबेडकर यांनी तर शनिवारी कवाडे यांनी नगरमध्येच माध्यमांशी संवाद साधत हत्याकांडाचा निषेध केला़ रामदास आठवले यांनी कोपर्डी येथे येण्याचे जाहीर केल्यानंतर काही संघटनांनी त्यांच्या दौऱ्याला आक्षेप घेतला होता. शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर कोपर्डीकडे निघालेले असताना पोलिसांनी त्यांना कर्जतमध्ये अडविले. त्यांनी पोलिसांशी वाद घातला.कोपर्डी व परिसरातील ग्रामस्थांनी मात्र, अतिशय संयमी भूमिका घेत हे प्रकरण हाताळले़ त्यामुळे घटनेनंतर गावात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही़ काही संघटनांच्या स्टंटबाजीच्या इशाऱ्यामुळे मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांना आंबेडकर व कवाडे यांना कोपर्डीत जाण्यापासून रोखावे लागले़ मुंबई विमानतळावर आलेल्या आठवलेंना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने त्यांनाही आपला दौरा रद्द केल्याचे समजते. कोपर्डीत आपण सोबत जाऊ, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल्याचे समजते़ मात्र, पोलीस यंत्रणेकडून गेलेल्या अहवालानंतरच मुख्यमंत्र्यांनी आठवलेंना न जाण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जाते.कवाडे यांनी मुंबईत आंदोलन झाल्यानंतर कोपर्डी येथे येऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचे जाहीर केले़ रिपाइंचे राज्य सचिव अशोक गायकवाड यांनी सांगितले, कोपर्डीत आम्ही पीडित कुटुंबाची भेट घेतली, तेव्हा कुणीही अडविले नाही़ त्यामुळे आठवले यांनाही कुणी अडविण्याचा प्रश्न येत नाही. (प्रतिनिधी)सामाजिक वातावरण दूषित करू नये - कवाडेअल्पवयीन मुलीबाबत घडलेल्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला दु:ख झाले आहे़ सर्वांनी एकत्र येऊन पीडित कुटुंबाच्या मागे उभे राहण्याची गरज असून, या घटनेवरून कुणीही सामाजिक वातावरण दूषित करू नये, असे आवाहन कवाडे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना केले़ काँग्रेसचा रास्तारोको : कोपर्डी बलात्कार प्रकरण, वाढती महागाई, वीज दरवाढीविरोधात नाशिक शहर कॉँग्रेस व अल्पसंख्याक सेलतर्फे मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. त्यामुळे काही वेळ द्वारका परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. शहराध्यक्ष शरद अहेर तसेच युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राहुल दिवे आदी आंदोलनात सहभागी झाले होते