शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रा. विशाल यांना राष्ट्रीय पुरस्कार

By admin | Updated: May 9, 2017 02:34 IST

आयआयटी मुंबईच्या पृथ्वी विज्ञान विभागामधील सहायक प्राध्यापक विक्रम विशाल यांना, भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेतर्फे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयआयटी मुंबईच्या पृथ्वी विज्ञान विभागामधील सहायक प्राध्यापक विक्रम विशाल यांना, भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेतर्फे (आयएनएसए) देण्यात येणारा प्रतिष्ठेचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे.तरुण वैज्ञानिकांमधील सर्जनशीलता आणि उत्कृष्ठतेचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. भारतातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनासाठी आयएनएसए ही संस्था दरवर्षी हा पुरस्कार देते. कांस्य पदक आणि २५ हजार रुपये रोख असे हे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्राध्यापक विशाल सध्या कार्बन डायआॅक्साइडचे उत्सर्जन कमी करणे आणि नैसर्गिक वायूंच्या माध्यमातून पर्यावरणावरील त्याचा प्रभाव या विषयावर काम करीत आहेत.२०१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेने ७३७ तरुण वैज्ञानिकांचा सन्मान केला आहे. या पुरस्काराच्या नियुक्तीविषयी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अजय के. सूद यांनी सांगितले की, प्रा. विक्रम विशाल यांच्या संशोधन कार्यात कमालीची जिद्द आहे. त्यामुळे भविष्यातही ही जिद्द अशीच राहावी, जेणेकरून संशोधन क्षेत्राला नवे आयाम प्राप्त व्हावे.तर प्रा. विक्रम विशाल यांनी या पुरस्काराविषयी आनंद व्यक्त करताना सांगितले की, या संशोधन कार्यात आयआयटी मुंबईचे प्रा. टी.एन. सिंग, मोनाश विद्यापीठाचे प्रा.रणजीत पी. जी. आणि स्टँडफोर्ड विद्यापीठाचे प्रा. जेनिफर विल्कॉस यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते. हा सन्मान मिळाल्यानंतर आपल्यावरील जबाबदारी अधिकच वाढल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मिथेनचा वापर करणे शक्य-प्रा. विक्रम विशाल यांनी आपल्या संशोधनाविषयी बोलताना सांगितले की, आपल्याकडे वर्षानुवर्षे नैसर्गिक वायू खडकांच्या संरचनेत अस्तित्वात आहे,तसेच भारताची विशाल भौगोलिक विविधता लक्षात घेऊन, ती कार्बन डायॉक्साइडच्या साठवणीसाठी भरपूर संधी देते. कार्बन डायआॅक्साइडच्या इंजेक्शनमुळे केवळ दीर्घ शाश्वत पृथ्वीचा विकास करण्यात मदत होणार नाही, तर वाढत्या ऊर्जेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मिथेनचाही वापर करता येईल.