शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

प्रा. साईबाबासह पाच जणांना जन्मठेप

By admin | Updated: March 8, 2017 05:54 IST

नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याबद्दल दोषी ठरवत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) प्रा. जी. एन. साईबाबा याच्यासह जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत

गडचिरोली : नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याबद्दल दोषी ठरवत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) प्रा. जी. एन. साईबाबा याच्यासह जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिरकी व पांडू नरोटे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याशिवाय विजय तिरकी यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवत न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. नक्षलवादी हिंसक कारवायांसाठी दिल्ली विद्यापाठीतील युवा कार्यकर्त्यांना तयार करणे, त्यांना गडचिरोलीतील जंगलांमध्ये कारवायांसाठी पाठवणे, नक्षल्यांसाठी थिंक टँक म्हणून काम करणे, असे प्रा. साईबाबा याच्यावरील आरोप सिद्ध झाले. जामिनावर असलेल्या साईबाबाला शिक्षा ठोठावल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींचे वकील सुरेंद्र्र गडलिंग यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाच्या आवारात लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांचा फौजफोटाही होता.गडचिरोली पोलिसांनी आॅगस्ट २०१३ मध्ये जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा याला महेश तिरकी व पांडू नरोटे यांच्यासह अटक केली होती. मिश्राच्या माहितीवरुन सप्टेंबर २०१३ मध्ये प्रशांत राही यास अटक केली. त्यानंतर ९ मे २०१४ रोजी साईबाबालाही अटक केली होती. प्रा. साईबाबा ९० टक्के अपंग असल्याने त्याच्या प्रकृतीबाबत सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा उपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. या पत्राला रिट याचिका म्हणून दाखल करुन घेत न्यायालयाने प्रा. साईबाबाला ३० जून २०१५ रोजी तीन महिन्यांचा तात्पुरता जामीन दिला. तो पुढे ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला. अशातच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ८ सप्टेंबर २०१५ रोजी हेम मिश्राची जामिनावर मुक्तता केली. मात्र, खंडपीठाचे न्या. अरुण चौधरी यांनी मुंबई खंडपीठाचा हस्तक्षेप अमान्य करीत २३ डिसेंबर २०१५ रोजी साईबाबा याचा जामीन अर्ज नामंजूर केला आणि ४८ तासांमध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर साईबाबाने २५ डिसेंबर २०१५ रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्याचदिवशी त्याची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. (प्रतिनिधी)नक्षलवादी चळवळीला जबर धक्का - प्रा. साईबाबाला झालेली शिक्षा ही नक्षलवादी संघटनेसाठी एक जबर धक्का मानला जात आहे. यामुळे साईबाबा याच्याप्रमाणे जे इतर माओवादाचा प्रसार करणारे आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत. शिक्षण क्षेत्रात राहून माओवादाचा प्रसार करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.- जिल्हा न्यायालयाने ४ मार्च २०१६ पासून नियमीत सुनावणी सुरु केली. ३१ मार्चपर्यंत आठही साक्षीदारांची साक्ष नोंदविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ४ एप्रिल २०१६ रोजी साईबाबाला जामीन मंजूर केला होता. - शिक्षेवरील सुनावणीत विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर प्रशांत सत्यनाथन यांनी केवळ अपंग असल्याच्या कारणाने साईबाबाला माफ करु नये, त्याचे गुन्हे गंभीर आणि समाजविघातक असल्याने कडक शिक्षेची मागणी केली. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सत्यनाथन, अ‍ॅड. सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.