शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भासाठी दिल्लीवर दबाव आणा - श्रीहरी अणे

By admin | Updated: January 24, 2016 00:25 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे महाराष्ट्रातून तरी शक्य नाही. महाराष्ट्र सरकार राज्य निर्माण करू शकत नाही; तिथे फक्त ठराव होतो. विदर्भातील आमदारांची संख्या लक्षात घेतली तर हा ठराव

चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे महाराष्ट्रातून तरी शक्य नाही. महाराष्ट्र सरकार राज्य निर्माण करू शकत नाही; तिथे फक्त ठराव होतो. विदर्भातील आमदारांची संख्या लक्षात घेतली तर हा ठराव मुंबईत पास होणे शक्य नाही. त्यामुळे दिल्लीवर दबाव आणा, तो कसा आणायचा यासाठी विचार करा, असे सांगत राज्याचे महाअधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्यासाठी लढ्याचे संकेत दिले.स्थानिक जनता महाविद्यालयात शनिवारी सायंकाळी झाल्या ‘विदर्भ गाथा’ या समारंभात त्यांनी दिल्लीवर दबाव आणण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. अणे म्हणाले, तेलंगणच्या निर्मितसाठी १२०० तरुणांनी बलिदान दिले. विदर्भासाठी असे रक्त सांडविण्याची दिल्लीकर वाट बघत असतील तर ते अयोग्य आहे. आम्ही वीज निर्माण करतो, कोळसा त्यांना देतो, तिकडच्या प्रकल्पासाठी आमचे जंगल देतो. विदर्भातील शेतकऱ्यांनी ठरविले तर महाराष्ट्रावर उपाशी राहायची पाळी येईल.विदर्भाच्या भावनांचा भडका उडाला तर त्याची किंमत कुणालाही भरून देता येणार नाही. आपणच आपली जाळपोळ करायची, आपल्याच माणसांच्या तोंडाला काळे फासायचे, आपल्याच माणसांना अपमानीत करायचे, हा मार्ग नव्हे. मात्र उद्याच्या भविष्यात हेच होणार, हे आपणाला आतापासून दिसत आहे, असे ते म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साहित्य संमेलनादरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल अणे म्हणाले, साहित्यिकांना महाराष्ट्राएवढाच विदर्भ प्रिय आहे. विदर्भातील साहित्यिकांनी विदर्भाबद्दल का बोलू नये? विदर्भातील मराठीपण, हिंदीपण समजून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.