शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकात अफजल खान वधाचे चित्र ठेवा!

By admin | Updated: July 26, 2016 19:21 IST

बालभारती अर्थात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास- भाग २ या पुस्तकात अफझल खान वध चित्राच्या जागी शिवाजी

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ : बालभारती अर्थात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास- भाग २ या पुस्तकात अफझल खान वध चित्राच्या जागी शिवाजी महाराज व अफजल खान भेटीचेचित्र छापले आहे. त्याविरोधात नाराज झालेल्या हिंदू जनजागृती समितीने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू नये, म्हणून छापलेले पुस्तक मागे घेण्याची मागणी समितीचे प्रवक्ते उदय धुरी यांनी केली आहे. धुरी म्हणाले की, पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांची युद्धनीती, स्फूर्तीस्थान असे धडेही वगळण्यात आले आहे. त्यामुळे हळूहळू शिवाजी महाराजांचा इतिहासच पुस्तकातून पुसून टाकण्याचा हा डाव आहे.

राज्य सरकारने येत्या सात दिवसांत नव्याने पाठ्यपुस्तके छापून विद्यार्थ्यांना योग्य इतिहास शिकवावा, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पुणे येथील शिक्षण सहसंचालक सुनील चव्हाण आणि बालभारतीचे विशेष अधिकारी मोगल जाधव यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.शिवाय शिक्षण सहसंचालकांना अफजल खान वधाचे छायाचित्र संस्थेनेनिवेदनासोबत भेट म्हणून दिले. मंत्रालयातही हे छायाचित्र लावण्याची मागणी वर्तक यांनी केली.................................तर मंडळ बरखास्त कराव्याकरणातील चुकांमुळे दरवर्षी चर्चेत राहणाऱ्या बालभारतीमुळे चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांमध्ये रुजवला जात असेल, तर मंडळ बरखास्त करण्याची मागणी अभय वर्तक यांनी केली. ते म्हणाले की, मुलांचे शैक्षणिक नुकसान न होता, योग्य इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे सात दिवसांत सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी. अन्यथा सर्व हिंदूत्त्ववादी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करतील.