शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

बालगृहातील बालके हंगामी वसतिगृहात टाका

By admin | Updated: June 27, 2016 04:47 IST

बालकांचे थकीत भोजन अनुदान, इमारत भाडे आणि कर्मचारी वेतनाचा प्रश्न ऐरणीवर येताच महिला-बालविकासने पुन्हा एकदा जबाबदारी झटकली

स्नेहा मोरे,

मुंबई- बालकांचे थकीत भोजन अनुदान, इमारत भाडे आणि कर्मचारी वेतनाचा प्रश्न ऐरणीवर येताच महिला-बालविकासने पुन्हा एकदा जबाबदारी झटकली आहे. बालगृहांतील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या तब्बल ८० हजारांवर बालकांना थेट शिक्षण विभागाच्या हंगामी वसतिगृहात पाठवण्याचा फतवा काढून, बालगृहे बंद करण्याच्या शक्यतांवर शिक्कामोर्तब केले आहे.स्वयंसेवी बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना त्या-त्या जिल्ह्यातील बाल कल्याण समिती बाल न्याय अधिनियमांतर्गत प्रवेश देते. या समितींना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांचा दर्जा प्राप्त आहे. ते एक स्वतंत्र न्याय प्राधिकरण आहे. या समितीच्या कामकाजावर ताशेरे ओढत महिला व बालविकास विभागाचे आयुक्त के.एम. नागरगोजे यांनी १ जून २०१६ला परिपत्रक काढून बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना बालगृहांत प्रवेश न देता, त्यांची रवानगी शिक्षण विभागाच्या हंगामी वसतिगृहात करण्याचे फर्मान काढून आयुक्तालयात बोलावलेल्या बैठकीतही तंबी देऊन बालगृहातील प्रवेश प्रक्रियेत खोडा घातला आहे. परिपत्रकातील पृष्ठ क्रमांक ७ मध्ये खास शिक्षण विभागाची जाहिरात करण्यासाठी आयुक्तांनी फर्मान काढल्याचे दिसते. या पृष्ठावरील मुद्दा क्रमांक १४ व १५मध्ये स्थलांतरित कष्टकरी, ऊसतोड, दगडांच्या खाणी-बांधकाम, रस्ते बांधणी मजूर, शेतमजूर यांच्या मुलांना बालगृहात प्रवेश न देता, त्यांची रवानगी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या हंगामी वसतिगृहात करण्याचा हुकूमच दिला आहे. त्यांच्या कामात ढवळाढवळ करून पर्यायाने बाल न्याय अधिनियमांशी फारकत होत असल्याची प्रतिक्रिया बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.>परिपत्रकातच विसंगत मुद्देआयुक्तांच्या लेखी आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गरिबांची मुले, स्थलांतरित कष्टकरी, ऊसतोड, दगडांच्या खाणी-बांधकाम, रस्तेबांधणी मजूर, शेतमजूर यांच्या मुलांना काळजी व संरक्षणाची गरज नाही. परिपत्रकातील पृष्ठ क्रमांक ६ वरील मुद्दा क्रमांक १२ व १३ मध्ये त्यांनी स्पष्टपणे ‘गरिबी व गावात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही’ अशी परिस्थिती सांगणाऱ्यांच्या मुलांना बालगृहांत प्रवेश न देण्याचे आदेशच दिले आहेत. वास्तविक, याच परिपत्रकातील पृष्ठ क्रमांक ४वर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५च्या कलम २ (१४) मध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची व्याख्या देताना पोट कलम १ मध्ये स्पष्टपणे ‘ज्यांना घर किंवा निवारा नाही, निर्वाहाचे साधन नाही’ अशा बालकांना बालगृहात प्रवेश द्यावा, असा उल्लेख आहे.>आयुक्तांचे तोंडी आदेश चुकीचे ‘बालगृहात फक्त अनाथच बालकांनाच प्रवेश द्या,’ असा आयुक्तांचा कोणताही लेखी आदेश नसताना आयुक्तांचा ‘तोंडी’ आदेश चुकीचा आहे. विसंगतीने परिपूर्ण असलेल्या परिपत्रकाच्या आधारे बालकल्याण समित्याही आपला अधिकार आणि अधिनियमातील कलमांचा ‘बाल हितासाठी’ विचार न करता, सरसकट बालगृहातील मुलांचे प्रवेश रद्द करत आहेत. त्यामुळे शिक्षण, संस्कार, तसेच काळजीची गरज असलेल्या बालकांची परवड होत आहे. रवींद्रकुमार जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बालगृह चालक व कर्मचारी महासंघ