शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

उदगीर बाजार समितीत पालकमंत्र्यांना धक्का; 18 पैकी 17 जागा काँग्रेसला तर भाजपाला 1 जागा

By admin | Updated: April 3, 2017 21:16 IST

त्यंत रंगतदार ठरलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने आपली हुकूमत पुन्हा कायम

ऑनलाइन लोकमत / चेतन धनुरे
उदगीर, दि. 3 - अत्यंत रंगतदार ठरलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने आपली हुकूमत पुन्हा कायम राखत चौखुर उधळलेला पालकमंत्र्यांचा वारु काँग्रेसने उदगीरात अडविला. १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकत काँग्रेस प्रणित पॅनलने बाजार समितीवर आपला झेंडा गाडला आहे. पदरी पडलेल्या सलगच्या पराभवानंतर मिळालेले हे यश काँग्रेससाठी जणू ‘ओयासिस’च ठरले़ तर पालकमंत्री संभाजीराव पाटील तसेच आमदार सुधाकर भालेराव यांच्यासाठी हा धक्का ठरला.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी रविवारी तब्बल ९५ टक्के मतदान झाले़ सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली़ तेव्हा भाजप प्रणित पॅनलचे व्यापारी मतदारसंघातील सचिन हुडे वगळता अन्श सर्व जागांवर काँग्रेस प्रणित पॅनलचे उमेदवारांनी जोरदार आघाडी घेतली होती़ तेव्हाच चित्र स्पष्ट झाले होते़ या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण गटातून  काँग्रेस प्रणित पॅनलचे सर्व ७ उमेदवार विजयी झाले़ धनाजी जाधव (४१७ मते), सुभाष धनुरे (४१०), कल्याण पाटील (४४२), रमेश पाटील (४०२), शिरीषकुमार पाटील (३८९), गजानन बिरादार (३८३) व रामराव बिरादार ३९० मते घेऊन विजयी ठरले़ सोसायटी महिला गटातून काँग्रेस प्रणित पॅनलच्याच चंचलाबाई लोहकरे ४०२ तर चंचलाबाई लोहकरे ४३६ मते घेऊन विजयी झाल्या़ सोसायटी इतर मागासवर्गीय गटातून पद्माकर उगिले ४१३ मते घेऊन विजयी झाले़ सोसायटी विमुक्त जाती / भटक्या जमाती गटातून संजीव पवार ३५३ मते घेऊन विजयी झाले़ 
ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण गटातून सिद्धेश्वर पाटील ४९३ तर संतोष बिरादार यांनी ४१५ मते घेत विजयाला गवसणी घातली़ ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती गटातून ३७३ मते घेत मोहन गडीकर यांनी विजय मिळविला़ ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून अनिल लांजे यांनी ४०७ मते मिळवून विजय संपादन केला़ हमाल मापारी मतदारसंघातून गौतम पिंपरे १९८ मते घेऊन विजयी झाले़ तर व्यापारी मतदारसंघातून कैैलास पाटील ६०४ घेवून विजयी झाले़ तर एकमेव जागा पदरात पडलेल्या भाजप प्रणित पॅनलचे सचिन हुडे हे विक्रमी ८५१ मतांनी विजयी झाले़ निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार करुन शहरातून आतषबाजी करीत मिरवणूक काढली़ स्रुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील लागोपाठच्या पराभवानंतर बाजार समितीत मिळालेला विजय काँग्रेससाठी वाळवंटातील हिरवळ (ओयासिस) ठरली आहे़ 
 
विजयाचा वारु रोखला-
 
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर तसेच आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाने उदगीरातील काँग्रेसचा भक्कम गड सर केला होता़ परंतु, सहकाराच्या आखाड्यात ‘वस्ताद’ आपणच असल्याचे काँग्रेसने बाजार समितीच्या निवडणुकीत दाखवून दिले़ 
 
गटातटाचा फटका़-
 
बाजार समितीच्या निवडणुकीत अगदी शेवटपर्यंत भाजपचे पॅनल नक्की ठरत नव्हते़ पॅनलवर माजी सभापती शिवाजी हुडे यांचे वर्चस्व दिसून आले़ त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी गटातटात विखुरले गेले़ परिणामी, आमदार भालेराव व शिवाजी हुडे या दोघांनीच मुख्यत्वे खिंड लढविली़ बहुतांश पदाधिकाºयांनी विजयासाठी विशेष रुची दाखविली नसल्याचे दिसून आले़ या फुटीचा फटका भाजपला बसला़
 
जि़प़ सभापतीपदही गेले़
 
जिल्हा परिषदेच्या विषय समितीत उदगीर तालुक्यासाठी एक पद निश्चित मानले जात होते़ कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद मिळण्याची शक्यता होती़ परंतु, उदगीर बाजार समितीत झालेल्या दारुण पराभवाने ऐनवेळी उदगीर तालुक्याला फाटा देत हे पद निलंगा तालुक्यास देण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले़
 
कारभारीही आडाणी़ !
 
सोसायटी व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा कारभार हाकणारे प्रतिनिधी बाजार समितीसाठी मतदार होते़ परंतु, या निवडणुकीतील अवैैध मतांचा आकडा पाहिल्यास कारभारीही आडाणी असल्याचे दिसून येत आहे़ सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण गटात ७८५ पैैकी ५३ मते अवैैध ठरली़ महिला राखीव गटात ३६, इतर मागासवर्गीय गटात २९, विमुक्त जाती/भटक्या जमाती गटात ६२, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात २७, अनु़जाती/जमाती गटात ४१, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात २८, व्यापारी गटात ११ तर हमाल मापारी गटात ६ मते अवैैध ठरली आहेत़