शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

गोल्डन गँगला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 05:01 IST

महापालिकेतील ‘गोल्डन गँग’वर जबरदस्त प्रहार करीत भारतीय जनता पार्टीने महापालिकेत

अमरावती : महापालिकेतील ‘गोल्डन गँग’वर जबरदस्त प्रहार करीत भारतीय जनता पार्टीने महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळविले. ८७ सदस्यीय सभागृहात भाजपाला ४५ जागा मिळाल्यात. पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आमदार सुनील देशमुख या उभय नेत्यांच्या नेतृत्वात भाजपाने ७५ ठिकाणी उमेदवार दिले. त्यापैकी ४५ उमेदवार विजयी झाल्याने त्यांचे नेतृत्व झळाळून उठले आहे. भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटची सत्ता उलथविली आणि काँग्रेसला १५ जागांवर रोखले. अवघ्या ७ जागांवरून भाजपाने ४५ जागांची मजल गाठली. काँग्रेसला १० जागांचा फटका बसला. जितक्या प्रभावीपणे भाजपा वाढली त्याच गतीने एमआयएम पक्षाचा प्रभावही वाढला. काँग्रेसनंतर एमआयएम हा १० जागा घेऊन तिसरा मोठा पक्ष ठरला आहे. २०१२च्या निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ ११ होते. यंदाच्या निवडणुकीत ते अवघ्या ७ जागांवर स्थिरावले. बहुजन समाज पक्षाने ६ जागा कायम ठेवल्या. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला ३ जागा मिळाल्या. रिपाइं आठवले गटाचे प्रकाश बनसोड तब्बल पाचव्यांदा महापालिकेत पोहोचले. मागील निवडणुकीत १७ जागा मिळविणाऱ्या राकाँला भोपळाही फोडता आला नाही. तब्बल १८ वर्षांनंतर भाजपाने पूर्ण सत्ता मिळविली.