शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

‘देशातही संघाचा छुपा अजेंडा राबविण्याचा हेतू’

By admin | Updated: December 3, 2015 00:44 IST

देशातील विविध घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन देशाला घातक आहे. गुजरातप्रमाणेच देश चालवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा या मौनामागे असून, यामुळे देशातील

पुणे : देशातील विविध घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन देशाला घातक आहे. गुजरातप्रमाणेच देश चालवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा या मौनामागे असून, यामुळे देशातील वातावरण धास्तावलेले असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तूरडाळ घोटाळ्यात राज्याबरोबर केंद्र सरकारही सामील असल्याचा आरोप त्यांनी केला.काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार मोहन जोशी आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे उद््घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकार तसेच पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. केंद्रीय मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर, दादरीसारख्या घटनांवर पंतप्रधान प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीत, त्यातूनच संघाचा छुपा अजेंडा राबविण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो, असे चव्हाण म्हणाले.पंतप्रधान कार्यालयाची कामकाज पद्धत मोदी यांनी बदलली आहे. ते म्हणाले, पुरस्कार वापसीवर त्यांच्याकडून केली जाणारी टीका अपरिपक्वतेचे लक्षण आहे. सतत परदेशात असणाऱ्या मोदी यांची जनतेतील विश्वासार्हता ढासळत चालली आहे. दिल्ली, बिहार व आता गुजरातमधील निवडणुकांचे निकाल त्याचेच द्योतक असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)स्मार्ट सिटी बोगस योजनास्मार्ट सिटी ही अत्यंत बोगस योजना असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सुरूवातीला १०० त्यानंतर २० व आता तर फक्त १० शहरांचीच निवड केली जाणार आहे. कामापेक्षाही या योजनेचा प्रचारच जास्त सुरू आहे, असे ते म्हणाले.