शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पुरोहितांचे स्टिंग हे पक्षांतर्गत खदखदीचं प्रतीक - शरद पवार

By admin | Updated: June 27, 2015 17:42 IST

राज पुरोहित यांचे स्टिंग ऑपरेशन म्हणजे भाजपातील पक्षांतर्गत खदखदीचं प्रतीक आहे असे सांगत भाजपामध्ये वाईट दिवस इतक्या लवकर येतील असं वाटलं नव्हतं असा टोला शरद पवार यांनी लगावला.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २७ - राज पुरोहित यांचे स्टिंग ऑपरेशन म्हणजे भाजपातील पक्षांतर्गत खदखदीचं प्रतीक आहे असे सांगत भाजपामध्ये वाईट दिवस इतक्या लवकर येतील असं वाटलं नव्हतं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. औंरगाबादमध्ये बोलताना त्यांनी भाजपामध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत ही टिपण्णी केली. 'पुरोहित यांच्या स्टिग ऑपरेशनच्या निमित्ताने पक्षात किती खदखद आहे हे स्पष्ट होते' असे ते म्हणाले. मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष व आमदार राज पुरोहित यांच्या स्टिंग ऑपरेशनची सीडी प्रसारित झाली असून त्यात पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावर टीका केली असून पक्षाचे आमदार मंगलप्रभात लोढांनाही लक्ष्य केल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पवार यांनीही टिपण्णी केली.
केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांची एकापाठोपाठ एक प्रकरणे बाहेर येत असून  पंकजा मुंडे यांच्या चिक्की घोटाळा प्रकरणावरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या प्रकरणाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. 'चिक्की घोटाळ्यावर काहीही बोलण्याची गरज वाटत नाही' असे ते म्हणाले.