शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमधील घर खरेदीसाठी तीन कोटी अदा

By admin | Updated: April 14, 2015 01:06 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थीदशेत वास्तव्य केलेले लंडनस्थित घर खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ३ कोटींची अग्रीम रक्कम (अ‍ॅडव्हान्स) संबंधितांच्या खात्यात जमा केली आहे.

मिलिंदकुमार साळवे - श्रीरामपूरभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थीदशेत वास्तव्य केलेले लंडनस्थित घर खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ३ कोटींची अग्रीम रक्कम (अ‍ॅडव्हान्स) संबंधितांच्या खात्यात जमा केली आहे. घर खरेदीच्या पुढील कार्यवाहीसाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय शिष्टमंडळ १६ एप्रिलला लंडनला जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकारानंतर, बाबासाहेबांनी १९२१-२२मध्ये वास्तव्य केलेली लंडनस्थित (१० किंग्ज हेन्रीरोड, एन. डब्ल्यू. ३) वास्तू खरेदी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली. १ सप्टेंबर २०१४ रोजी ही वास्तू विक्रीस काढली होती. त्यानंतर राज्य सरकारने ही वास्तू खरेदी करण्यास स्वारस्य असल्याचे अधिकृतरीत्या संबंधितांना कळविले. अपेक्षित दराच्या १० टक्के रक्कम तातडीने अदा करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या भागभांडवलातून तरतूद करण्याचा निर्णय झाला. तसेच हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी लंडनमधील सॉलिसिटर मेसर्स सेडॉन यांची नियुक्ती करण्यात आली. महामंडळाने तातडीने १० टक्के रक्कम म्हणून ३ कोटी १० लाख रुपये सॉलिसिटर सेडॉन यांच्या बँक खात्यात जमा केले. घर खरेदीच्या पुढील कार्यवाहीसाठी सामाजिक न्याय मंत्री बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे व या खात्याचे प्रधान सचिव उज्ज्वल उके १६ ते २२ एप्रिलदरम्यान लंडनला जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्यास परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने या विदेश दौऱ्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून १५ लाख रुपये मंजूर केले आहेत. या दौऱ्यात खरेदीच्या पुढील व्यवहारावर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे.