शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

हमी केंद्रांची धान्य खरेदी उधारीवर

By admin | Updated: June 24, 2014 00:52 IST

शासनाच्या हमीभाव केंद्रावर शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पेरणीच्या तोंडावरही पैसे मिळत नसल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दीड कोेटी अडकले : २५ हजार शेतकरी अडचणीतरूपेश उत्तरवार - यवतमाळ शासनाच्या हमीभाव केंद्रावर शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पेरणीच्या तोंडावरही पैसे मिळत नसल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी हवालदिल झाले आहेत.शेतमालास योग्य दर मिळावा म्हणून जिल्ह्यात हमी केंद्र उघडण्यात आले. त्यानुसार हरभरा आणि तुरीचे खरेदी केंद्र सुरू झाले. खुल्या बाजाराच्या तुलनेत हमी केंद्राचे दर अधिक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पहिली पसंती हमी केंद्राला राहिली. जिल्ह्यात १७ पैकी सात केंद्रांवर धान्य खरेदी करण्यात आली. जानेवारी ते मे या सहा महिन्यात १९ हजार क्विंटल धान्य खरेदी केले. पाच कोटी रूपयांच्या धान्य खरेदीतील १ कोटी ४० लाख रुपये अद्यापही २५ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही. आता शेतकरी मार्केटींग फेडरेशनचे उंबरठे झिजवित आहेत. नाफेडने १७ केंद्रावर खरेदीची घोषणा केली. मात्र खरेदी विक्री संघ सक्षम नसल्याने केवळ सात केंद्रावर खरेदी झाली. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत तूर खरेदी करण्यात आली. १० फेब्रुवारी ते २४ मेपर्यंत हरभरा खरेदी झाली. राळेगाव केंद्रावर तीन हजार २७० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. १ कोटी ४० लाख ६१ हजार रूपयाच्या खरेदीतील नऊ लाख एक हजार अद्याप बाकी आहेत. दारव्हा केंद्रावर २ हजार ५५८ क्विंटल तुरीची खरेदी झाली. १ कोटी १० लाख रूपयांच्या खरेदीतील २३ लाख मिळाले नाही. पुसद येथे २५१ क्विंटल ९१ किलो तूर खरेदी झाली. त्यातील ८३ हजार शिल्लक आहे. हीच स्थिती इतर केंद्रांची आहे. हरभरा खरेदी १० फेब्रुवारी ते २४ मेपर्यंत करण्यात आली. दिग्रसच्या हमी केंद्रावर ७४६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. २३ लाख १२ हजार ६०० रूपयांच्या हरभरा खरेदी पैकी दोन लाख रूपये मिळालेच नाही. उमरखेड येथील केंद्रावर १ कोटी ३९ लाख १५ हजार रूपयांचा हरभरा खरेदी झाला. मात्र २२ लाख रूपये मिळायचे आहेत. सात केंद्रावर ८ हजार ८३१ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. २ कोटी ४७ लाख रूपयांच्या खरेदीतील २५ लाख ९६१ रूपये शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत.